Solapur News : सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील प्रलंबित चारा छावणीच्या बिलांबाबत बुधवार (ता. १०) रोजी मंत्रालयात मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीला संबंधित खात्याचे सचिव व अधिकारीदेखील उपस्थित होते. चारा छावण्यांच्या प्रलंबित बिलांबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होईल, अशी माहिती आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी दिली..या बैठकीमध्ये आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी छावणी चालकांच्या रखडलेल्या बिलांबाबत ठामपणे भूमिका मांडली. त्यावर प्रतिक्रिया देताना मंत्री पाटील यांनी या प्रकरणाची फाइल मुख्यमंत्री महोदयांकडे जाऊन संबंधित खात्याकडे आलेली असून लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले..Monsoon Animal Care: जनावरांना पावसाळ्यातील आजारांपासून वाचवण्यासाठी व्यवस्थापन पद्धती.गेल्या अनेक वर्षांपासून सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील चारा छावणीची बिले शासन दरबारी प्रलंबित असल्याने छावणी चालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यांनी दुष्काळी परिस्थितीत पशुधनाचे रक्षण करण्यासाठी मोठी आर्थिक गुंतवणूक केली होती. अनेकांनी कर्ज काढून छावण्या चालवल्या. .त्यामुळे थकीत बिले तातडीने मिळावीत, अशी मागणी सातत्याने होत होती. २०२४ च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत थकीत बिले देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही बिले तातडीने देण्यात यावीत, अशी छावणी चालकांची मागणी आहे. .Animal Care: भौतिक सुविधांपेक्षा जनावरांच्या आरोग्यावर भर.आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या पाठपुराव्यामुळे या प्रश्नाला लवकरच तोडगा निघणार असून प्रलंबित बिले छावणी चालकांना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त होत आहे..थकले ४० कोटी रुपयेचारा छावण्यांचे सध्या सांगोला तालुक्यातील २० कोटी ८६ लाख ९० हजार ५९६ आणि मंगळवेढा तालुक्यातील १२ कोटी ७ लाख ५० हजार ७३१ रुपये थकीत आहेत. दोन्ही तालुक्याचे मिळून एकूण ४० कोटी ९४ लाख ४१ हजार ३२७ रुपये बिल प्रलंबित आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.