Kolhapur News: राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत २०२५/२६ उन्हाळी हंगामासाठी तेलबियांचे उत्पादन आणि उत्पादकता वाढवण्यासाठी शासनामार्फत प्रोत्साहनपर योजना राबवली जात आहे. जिल्ह्यात सर्वत्र मशागत करून भुईमूग पेरणी सुरू झाली असताना अद्याप आयुक्तालयाकडून लॉटरी निघाली नसल्यामुळे बियाण्याचा पत्ता नाही. यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. कृषी खात्याकडून बियाणे मिळण्याची तारीख पे तारीख दिली जात आहे..उन्हाळी हंगामासाठी भुईमूग पिकासाठी जिल्ह्यातील प्रमाणित बियाणे वितरणसाठी ७५० क्विंटल व पीक प्रात्यक्षिकांसाठी २९० क्विंटल असे उद्दिष्ट प्राप्त झाले होते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर बियाणे वितरण करण्यात येणार आहे. १५ जानेवारीपर्यंत बियाणे उपलब्ध होईल; अशी माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिली होती. .Groundnut Seeds Scheme : उन्हाळी हंगामासाठी शंभर टक्के अनुदावर मिळणार भुईमुगाचे बियाणे.शासनमान्य बियाणे वितरण केंद्रामार्फत उन्हाळी भुईमूग पिकासाठी हेक्टरी दीडशे किलो शासन किलो ११४ रुपये प्रमाणे खर्च करून प्रमाणित बियाणे वितरण करणार आहे. पीक प्रात्यक्षिकासाठी हेक्टरी १०० किलो बियाणे वितरित केले जाणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी व शेतकरी गटांनी याचा लाभ घेण्यासाठी तालुक्यातील सहाय्यक कृषी अधिकारी, कृषी विभाग यांच्याकडे संपर्क साधावा, यामध्ये करवीर, कागल, राधानगरी, गगनबावडा, हातकणंगले सर्व तालुक्यांमध्ये बियाणे वितरण कार्यरत राहणार होते..जिल्ह्यात १२८० हेक्टरवर उन्हाळी भुईमूग केला जातो. १५ जानेवारीपासून पेरणीला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांनी कृषी खात्याने आव्हान केल्यानंतर महाडीबीटी पोर्टलवर बियाणे मागणी नोंदवले असताना कृषी खात्याकडून लॉटरी निघाली नसल्यामुळे बियाण्याची तारीख ती तारीख दिली जात आहे. उन्हाळी हंगामासाठी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत भुईमूग पेरणी करता येणार आहे..Summer Seeds Scheme: उन्हाळी भुईमूग बियाणे अनुदानावर मिळणार.बियाणे उपलब्ध नसल्यामुळे हंगाम पुढे जाण्याची भीती शेतकऱ्यांना असून पुढील हंगाम पावसाळ्यात जातो यामुळे नुकसान होऊ नये यासाठी बियाणे विकत घेऊन पेरणीला प्राधान्य दिले जात आहे..‘क्षेत्रानुसार बियाणे द्या’‘शासनाचे काम सहा महिने थांब’ अशी म्हण प्रचलित आहे. अशी स्थिती या बियाण्याबाबत झाली आहे. बियाणे देण्याबाबत शासनाने लॉटरी पद्धत आणि ऑनलाईन पद्धत बंद करून थेट रब्बी आणि उन्हाळी हंगामाच्या क्षेत्रानुसार बियाणे द्यावे; अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.