Pune News: पुरंदर तालुक्यातील रब्बी हंगामातील वाटाणा पीक जोमदार बहरले आहे. मात्र बाजारात सध्या परराज्यातील वाटाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याचा स्थानिक गोड वाटाण्याला मोठा फटका बसला आहे. भोगी सण तोंडावर असताना बाजारभाव कोसळले आहेत. उत्पादन खर्चही निघतो की नाही या चिंतेने उत्पादकांना ग्रासले आहे..तालुक्यात सासवड व दिवे येथील बाजारामध्ये स्थानिक वाटाणा कमी मात्र परराज्यातून येणाऱ्या वाटाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. स्थानिक गोड वाटाण्याला याचा मोठा फटका सध्या बसताना दिसत आहे. यामुळेच नाममात्र २५ ते ३० रुपये प्रति किलो दराने वाटाणा विक्री करावी लागत आहे..Onion Farmer Issue: शेतकऱ्यांची ‘एनसीसीएफ’वर धडक.पोषक वातावरणामुळे अत्यंत चांगल्या प्रतीचा वाटाणा तालुक्यात येत असल्याने याला सर्वत्र मोठी मागणी असते. खरीप हंगामातील वाटाणा पीक यंदा अतिवृष्टीमुळे धोक्यात येऊन, उत्पादकांचा उत्पादन खर्च देखील निघालेला नव्हता. यामुळे रब्बी हंगामात तरी वाटाण्याचे दोन पैसे चांगले घडतील, अशी अपेक्षा उत्पादकांना होती..खरीप हंगामातील नुकसान रब्बीतील वाटाणा भरून काढेल, अशी अपेक्षा उत्पादकांना होती. परराज्यातून येणारा वाटाणा पुणे येथील मार्केट यार्डमधून विक्रेते सासवड व दिवे येथील बाजारात विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात आणत आहेत. यामुळे या वाटाण्याचा फटका स्थानिक वाटाणा उत्पादकांना बसत आहे..Farmer Issue: नारळ, सुपारी उत्पादक विमा संरक्षणाअभावी अडचणीत.पुणे शहरातून येणाऱ्या वाटाणा विक्रेत्यांचा वाटाणा पाहता या दोन्ही बाजारात नक्की शेतकऱ्यांसाठी शेतमाल विक्री करता बाजार आहे की व्यापाऱ्यांना करता असे चित्र पाहून वाटत आहे..तोडणी, वाहतूक खर्च निघणे अवघडवाटाण्याच्या पडत्या बाजारभावामुळे वाटाणा उत्पादकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. विक्रीतून वाटाणा उत्पादन खर्च बाजूलाच मात्र तोडणी, वाहतूक, मशागत हा खर्च देखील निघणे अवघड होत आहे. यामुळे थंडीत वाटाण्याला चांगल्या प्रकारची गोडी आली असली तरी देखील बाजारभावाने वाटाणा उत्पादकांच्या तोंडी मात्र कडवटपणाचा पाहायला मिळत आहे..वाटाणा पीक आता पूर्वीप्रमाणे कमी खर्चात येणारे राहिलेले नाही. यामुळे वाटाण्याचे बाजारभाव पन्नास रुपयांच्या वर असतील तरच त्यातून शेतकऱ्यांना दोन पैसे शिल्लक राहतात. मात्र, सध्या बाहेरील राज्यातून येणाऱ्या वाटाण्यामुळे उत्पादकांच्या पदरी निराशा पडत आहे.पोपट कुदळे, वाटाणा उत्पादक.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.