parbhani News: सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गंत रेशन दुकानावरुन (रास्तभाव धान्य दुकान) राष्ट्रीय अन्न सुरक्षा अन्न योजने अंतर्गंत अंत्योदय योजना आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थी कुटुंबांना ज्वारीचे वितरण केले जात आहे..त्यासाठी परभणी जिल्ह्याला नोव्हेंबर महिन्यासाठी ज्वारीचा १३ हजार ४७० क्विंटल आणि डिसेंबर महिन्यासाठी ज्वारीचा १३ हजार ५७४ क्विंटल साठा (नियतन) मंजूर आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा विभागाच्या सूत्रांनी दिली..अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या पत्रानुसार २०२४-२५ मध्ये किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गंत राज्यात पणन हंगाम २०२४-२५ मध्ये ज्वारीचे अतिरिक्त उत्पादन होऊन मोठ्या प्रमाणात ज्वारीची खरेदी करण्यात आली आहे..Rabi Season: रब्बी हंगामात ज्वारीचा वाढता पेरा.या ज्वारीचे वितरण अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थींना वितरित करण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार परभणी जिल्ह्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातून ज्वारीची उचल करायची आहे..Agrowon Podcast: ज्वारीचा भाव टिकून; गवार तेजीत, जांभळाला उठाव, मुग दबावात, सोयाबीन दर मंदीत.परभणी जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात अंत्योदय अन्न योजनेतील ४२ हजार ६०३ रेशन कार्डधारकांसाठी प्रत्येकी ८ किलोनुसार ३ हजार ४१० क्विंटल आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील १० लाख ६ हजार ९५ सदस्यांसाठी प्रतिसदस्य १ किलोनुसार १० हजार ६० क्विंटल असे दोन्ही मिळून एकूण १३ हजार ४७० क्विंटल ज्वारीचा साठा मंजूर आहे..डिसेंबर महिन्यात अंत्योदय अन्न योजनेतील ४२ हजार ७५३रेशन कार्डधारकांसाठी प्रत्येकी ८ किलोनुसार ३ हजार ४०९ क्विंटल आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील १० लाख २० हजार३६२ सदस्यांसाठी प्रतिसदस्य १ किलोनुसार १० हजार १६५ क्विंटल असे दोन्ही मिळून एकूण १३ हजार ४५७४ क्विंटल ज्वारीचा साठा मंजूर आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.