Ghansangavi News: रुई (ता. अंबड) शिवारातील पाझर तलाव क्रमांक दोनच्या भिंतीला गुरुवारी (ता. १८) मध्यरात्री अचानक मोठे भगदाड पडून तलावाचे संपूर्ण पाणी शेजारील शेतात ओसंडून वाहिले. या दुर्घटनेमुळे शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली जाऊन उद्ध्वस्त झाली आहेत. केवळ पिकांचेच नव्हे, तर शेतातील विहिरी, शेतीच्या बांधकामांनाही मोठे नुकसान झाले आहे. .अंबड तालुक्यातील रुई गावाच्या पश्चिमेस शेतात जिल्हा परिषद बांधकाम विभाग, जालना लघुसिंचन अंतर्गत ४० ते ५० एकरांमध्ये पाझर तलाव बांधण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अवकाळी आणि मुसळधार पावसामुळे तलाव पूर्ण क्षमतेने भरला होता..Farmer Issue: आत्महत्या, की व्यवस्थेचा बळी!.मात्र, पाझर तलावाची दुरुस्ती व देखभाल वेळेवर न झाल्याने अखेर त्याची भिंत कोसळली. एकदम मोठा पाण्याचा मारा झाल्याने लगतच्या शेतजमिनी खरडून गेल्या, शेतातील माती वाहून गेल्यामुळे जमीन ओसाड व नापीक होण्याच्या स्थितीत आली आहे. काही ठिकाणी पिके उखडून वाहून गेली..यात अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी बुजल्या असून पाण्याचा स्रोतच नष्ट झाला आहे. त्यामुळे येत्या हंगामात सिंचनाचा गंभीर प्रश्न उभा होणार आहे. रुई शिवारातील जवळपास २०० एकर क्षेत्र यात बाधित झाले आहे. मागणी करूनही दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने घडली घटना पाझर तलावाच्या भिंतीवर मोठ-मोठे झाडे असल्याने भिंतीला भगदाड पडले होते..Maharashtra Farmer Issue: पीक नुकसानीच्या पंचनाम्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या धमकीनंतर शेतकऱ्याची आत्महत्या.पाझर तलावाची दुरुस्ती होऊन पाझर तलाव फुटला नसता. तसेच शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे पिकाचे नुकसान झाले नसते. यामुळे याला जबाबदार कोण अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे विभाग कनिष्ठ अभियंता एच. के. राठोड यांनी आठ दिवसापूर्वीच पडलेले भगदाड गोण्यामध्ये माती वगैरे भरून थातुरमातूर दुरुस्ती केली. .पाझर तलाव दुरुस्तीसाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे जूनपूर्वीच दुरुस्ती व्हावी, यासाठी तत्काळ निधी मागितला होता, मात्र मिळाला नाही. निधी मिळताच दुरुस्तीचे कामे केली जातील.-पूजा बुलबुले, उपअभियंता लघुसिंचन उपविभाग, जिल्हा परिषद.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.