Pune News: राज्याच्या नव्या ऊस गाळप हंगामासाठी परवाना देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मागील थकित एफआरपीची पूर्ण रक्कम शेतकऱ्यांना दिली नसल्यास परवाना मिळणार नाही, असे साखर आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे. .गाळप हंगाम-२०२५-२६ मधील परवाने वाटताना साखर कारखान्यांप्रमाणेच साखर आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनीदेखील नियोजन पूर्वक कामे करावीत, अशा सूचना साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ यांनी दिल्या आहेत..Sugarcane FRP: एकरकमी एफआरपीप्रश्नी शेतकऱ्यांची फसवणूक थांबवावी: राजू शेट्टी .गाळप परवान्यासाठी कारखान्यांकडून http://crushinglic.mahasugar.co.in/login.aspx या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज दाखल होत आहेत. मात्र, प्रत्येक अधिकाऱ्याने या अर्जांवर मुदतीत निर्णय घ्यावा, असे आयुक्तांनी आढावा बैठकीत सांगितले..परवाने अर्जांची छाननी करताना कारखान्यांकडील विविध कर, शुल्क, भरणा याची थकबाकी तपासली जाणार आहे. मागील हंगामात गाळलेल्या उसावर प्रतिटन पाच रुपये मुख्यमंत्री सहायता निधी, प्रतिटन ५० पैसे साखर संकुल वटणावळ निधी, थकित शासकीय भागभांडवल, कर्ज व हमीशुल्क भरणा केल्याचा पुरावा साखर कारखान्यांना अर्जासोबतच द्यावा लागेल..Sugar Industry: कारखान्यांनी नवतंत्रज्ञान, पारदर्शकतेची कास धरावी: अनिल कवडे .सहकारी साखर कारखान्यांनी साखर विक्री करीत टॅगिंगद्वारे शासकीय वसुलीच्या रकमा कोषागारात जमा कराव्यात, भाडेतत्त्वावर किंवा भागिदारी पद्धतीने गाळप हंगाम करणाऱ्या कारखान्यांनी नोंदणीकृत कराराचे पुरावे सादर करावेत, असेही साखर आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे..साखर कारखान्यांनी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर सोयीनुसार परस्पर धुराडे पेटवू नये, असे आयुक्तालयाने बजावले आहे. ‘‘मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची बैठक होते. त्यात गाळप हंगामाची तारीख जाहीर केली जाते. मात्र, या तारखेपूर्वीच काही कारखाने बिनदिक्कत गाळप चालू करतात. या कारखान्यांवर ‘महाराष्ट्र साखर कारखाने क्षेत्र आरक्षण, ऊस गाळप, वितरण नियमन आदेश १९८४’मधील तरतुदीनुसार कारवाई केली जाते. परंतु, दंड भरून प्रकरण मिटवले जाते,’’ असे एका अधिकाऱ्याने सांगितले..परवाना मंजुरीसाठी अधिकाऱ्यांनाही मुदतकारखान्यांनी अर्ज दाखल करणे ३० सप्टेंबरविशेष लेखापरीक्षकांकडून छाननी दोन दिवसप्रादेशिक सहसंचालकांकडून छाननी तीन दिवसअर्थ शाखेकडून छाननी तीन दिवसविकास शाखेकडून छाननी दोन दिवसप्रशासन शाखेकडून छाननी दोन दिवससाखर आयुक्तांकडून मान्यता दोन दिवस.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.