Parbhani News: पंतप्रधान पिकविमा योजनेअंतर्गत खरीप २०२४-२५ मधील २ हजार ४७८ शेतकऱ्यांना पीकविम्याचे प्रलंबित २.३५ कोटी रुपये अदा करावेत. रब्बी हंगामातील १७७ शेतकऱ्यांना ८ लाख रुपये अदा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी विमा कंपनीच्या प्रतिनिधींना दिले..जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी विभागाच्या आढावा घेतला. या वेळी श्री. चव्हाण म्हणाले, की नवीन वर्षात शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्याचा संकल्प करून योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. अॅग्रीस्टॅक व पीएम किसान अॅग्रीस्टॅक शेतकरी ओळख क्रमांक योजनेअंतर्गत उर्वरित शेतकऱ्यांचे आयडी काढण्यासाठी क्षेत्रीय यंत्रणेने गावपातळीवर संपर्क साधण्याच्या सूचना देण्यात आल्या..Crop Insurance: पीक पडताळणीसाठी एमआरसॅकचा उपयोग न करण्याची मागणी.पीएम किसान योजनेची प्रगती वाढविण्यावर भर द्यावा. विविध कृषी पुरस्कार प्रस्तावांतर्गत १० प्रस्ताव प्राप्त झाले त्यास मंजुरी देऊन वरिष्ठ स्तरावर पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या. शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र, गुरू म्हणून असणारे महाविस्तार ॲप जिल्ह्यातील १.५० लाख शेतकऱ्यांना ॲप मोबाइलमध्ये डाउनलोड करून घेतले..Crop Insurance: सरासरी पैसेवारी ५० पैशांच्या आत.मग्रारोहयो अंतर्गत १८१ हेक्टर लागवड झाली. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत ४ हजार ८१० निवड झाली आहे. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे योजनेमध्ये ६९२ शेतकऱ्यांची शेततळी मार्चअखेर पूर्ण करून घ्याव्यात. अस्तरीकरण व कांदाचाळ या योजनेवर शेतकऱ्यांना अधिक लक्ष देण्याच्या सूचना दिल्या. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत २१६ कामे प्रलंबित आहेत. प्रकिया उद्योग गोदाम या बाबीचा समावेश करण्यात आला आहे..या योजनेअंतर्गत ४ हजार ६६ २ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक २.० अंतर्गत १२१.८८ लाख रुपये खर्चास मान्यता दिली. १० हजार शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याची योजना ‘आत्मा’ मार्फत राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामिण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) अंतर्गत १६ शेतकरी उत्पादन कंपन्यांनी ३२ हजार टन साठवण क्षमतेच्या गोदामांची उभारणी केली, तसेच प्रतिदिन ४०० टन धान्ये स्वच्छता व प्रतवारी यंत्रणा स्थापित केली आहे, अशी माहिती आत्मातर्फे या वेळी देण्यात आली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.