Soil Conservation: गेल्या महिन्यातील अतिवृष्टीमुळे जमीन सुपीकतेचे मोठे नुकसान झाले आहे. दर्जेदार पीक उत्पादनासाठी जमिनीची सुपीकता जपणे महत्त्वाचे आहे.अतिवृष्टीमुळे जमिनीचा सुपीक थर वाहून जातो. महत्त्वाची पोषक तत्त्वे आणि जैविक पदार्थांचा नाश होतो. मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी होते.