Illegal Fertiliser Case: सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यातील परुळे (ता. वेंगुर्ला) येथे विनापरवाना रासायनिक खतांचा साठा केल्याप्रकरणी कृषी विभागाच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत ६२ हजार ९८० रुपये किमतीचा खतसाठा जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी वेंगुर्ला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..परुळे येथे विनापरवाना रासायनिक खतांचा साठा केल्याची माहिती कृषी विभागाच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार बुधवारी (ता. १९) सकाळी अकराच्या सुमारास कृषी अधिकारी तथा खत निरीक्षक प्रकाश मोहिते यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक संजय पवार, सहायक कृषी अधिकारी सज्जन पवार, .Illegal Fertilizer Stock Seized: अकोल्यातील रुंभोडीत विनापरवाना खतसाठा जप्त.जानवी खडपकर आणि श्वेता चव्हाण यांच्या पथकाने परुळे येथील अजित चंद्रकांत राऊत यांच्या घराजवळील खोलीवर छापा टाकला. या वेळी खोलीत रासायनिक खतांचा साठा आढळून आला..Fake Fertilizer : कुहीत बोगस खतसाठ्यावर कृषी विभागाची कारवाई.खतसाठ्याचे मोजमाप केल्यानंतर त्याची किंमत ६२ हजार ९८० रुपये असल्याचे आढळून आले. या खतसाठ्यासाठी कोणताही परवाना नसल्याने कृषी विभागाने वेंगुर्ला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे..जिल्ह्यात खरीप हंगाम सुरू झाल्यानंतर विनापरवाना खतसाठ्याविरोधात झालेली ही चौथी कारवाई आहे. कृषी विभागाने काही कृषी केंद्रांचे परवाने रद्द, तर काहींचे परवाने निलंबित केले आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.