Crop Advisory Rahuri Region हवामान अंदाज प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त हवामान अंदाजानुसार, पुढील पाच दिवस आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. ता. ४ व ५ सप्टेंबर रोजी काही ठिकाणी मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. इतर दिवस हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. ता. ३ ते ५ सप्टेंबर या काळात घाट भागात विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम ते जोरात पाऊस पडण्याचा इशारा देण्यात येत आहे. .मूगकाढणीची अवस्थाबहुतांश ठिकाणी मूग पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे. मुगाच्या शेंगा ७५ टक्के वाळल्यावर पहिली तोडणी करायची असते. त्यानंतर ८ ते १० दिवसांनी राहिलेल्या सर्व शेंगा तोडाव्यात. या तोडणी पावसाची उघडीप मिळताच करून घ्याव्यात.पावसाची शक्यता असल्याने, काढणी केलेले धान्य सुरक्षित ठिकाणी किंवा प्लॅस्टिकने झाकून ठेवावे.शेंगा खळ्यावर सूर्यप्रकाशात चांगल्या वाळवल्यानंतर झोडणी करता येईल. (काठीच्या साहाय्याने झोडपून दाणे अलग करून घ्यावेत.) साठवण कोंदट किंवा ओलसर जागेत करू नये. शक्य झाल्यास धान्यास १ टक्का करंज किंवा एरंडीचे तेल चोळावे किंवा कडुनिंबाचा पाला (५ टक्के) धान्यात मिसळून धान्य साठवावे. यामुळे धान्य साठवणुकीतील किडींपासून संरक्षण होते.फळझाडेलीफ मायनर, सायला आणि फुलकिड्यांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी इमिडाक्लोप्रिड (१७.८ एसएल) ०.३ मि.लि. प्रती लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. माइट्सच्या नियंत्रणासाठी स्पायरोमेसिफेन (२२.९ एस.सी.) ०.८ मि.लि. प्रती लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी..Crop Advisory: कृषी सल्ला : कोकण विभाग.तूरफांद्या फुटण्याची अवस्थातूर पिकामध्ये वांझ रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावी.मकावाढीची अवस्थालष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास, अळीच्या वाढीच्या सुरुवातीच्या (१ ते ३ अवस्था) अवस्थांमध्ये निंबोळी अर्क ५% किंवा ॲझाडिरॅक्टीन (१५०० पीपीएम) ५ मि.लि. प्रती लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. अथवाक्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (१८.५% एस. सी.) ४० ग्रॅम प्रती हेक्टर किंवा इमामेक्टीन बेंझोएट (५% एसजी) ८ ग्रॅम प्रती लिटर या प्रमाणात फवारणी करावी. अथवास्पिनेटोरम (११.७ एस. सी.) ०.५ मि.लि. प्रती लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. अथवाइमामेक्टीन बेन्झोएट (५%) अधिक ल्युफेनुरॉन (४०% डब्लू.जी.) (संयुक्त कीटकनाशक) ०.२ ग्रॅम किंवा नोव्हाल्युरॉन (५.२५%) अधिक इमामेक्टीन बेंझोएट (०.९% एस. सी.) (संयुक्त कीटकनाशक) ३ मि.लि. प्रती लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी..Crop Advisory: कृषी सल्ला (कोकण विभाग) .भाजीपालाफुलकिड्यांच्या (थ्रिप्स) नियंत्रणासाठी कडुनिंबाची भुकटी ५०० ग्रॅम (५% अर्क) किंवा कडुलिंबाचे तेल ५० मि.लि.किंवा कडुनिंब आधारित फॉर्म्युलेशन (५ ईसी असल्यास १ मि.लि. आणि ०.०३ ईसी असल्यास ५ मि.लि. प्रती लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. (ॲग्रेस्को शिफारस)फुलकिड्यांच्या प्रादुर्भावाची तीव्रता अधिक असल्यास, प्रोफेनोफॉस (५० ईसी) २ मि.लि. किंवा स्पिनोसॅड (४५ एससी) ०.३ मि.लि. किंवा स्पिनेटोरम (११.७ एससी) ०.९ मि.लि. किंवा सायॲन्ट्रानिलीप्रोल (३ ओडी) २ मि.लि. प्रती लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.कोळी (माइट्स) - कोळी किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास, इथिऑन (५० ईसी) १.५ मि.लि. किंवा प्रोपारगाईट (५७ ईसी) ३ मि.लि. प्रती लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.पांढरी माशी : ही रसशोषक किडी असून, तिच्या प्रत्यक्ष नुकसानीसोबतच विषाणूजन्य रोगांचा प्रसारामुळे मोठे नुकसान होते. ते टाळण्यासाठी पांढऱ्या माशीच्या जैविक नियंत्रणाकरीता पिकाच्या अवस्थेनुसार पिवळे चिकट सापळे, सापळा पिके, जैविक बुरशीनाशके (मेटारायझीयम, ट्रायकोग्रामा, व्हर्टीसिलीअम इ.) या एकात्मिक पद्धतींचा अवलंब करावा.रासायनिक नियंत्रणासाठी, सायॲन्ट्रानिलिप्रोल (१०.२६ ओडी) १.८ मि.लि. किंवा इमिडाक्लोप्रिड (१७.८ एसएल) ०.३ मि.लि. किंवा फेनप्रोपॅथ्रिन (३० ईसी) ०.५ मि.लि. किंवा पायरीप्रॉक्झिफेन (१० ईसी) १.७ मि.लि. प्रती लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. .तीळतिळामध्ये पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव अनेक ठिकाणी दिसून येत आहे. हा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर असल्यास निंबोळी अर्क (५ % ) किंवा ॲझाडिरेक्टीन (१५०० पीपीएम) ५ मिलि प्रति लिटर किंवा कारटॅप हायड्रोक्लोराईड (५० एसपी) २ ग्रॅम प्रती लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.कांदालागवडरांगडा कांदा लागवडीसाठी बसवंत ७८०, फुले समर्थ, एन-२-४-१ इ. सुधारीत वाणांची निवड करावी.लागवडीची वेळ : सप्टेंबर - ऑक्टोबर.बियाण्याचे प्रमाण: ८ ते १० किलो/ हेक्टर.ऊसमावा आणि पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी ५% निंबोळी अर्क किंवा ॲझाडिरेक्टीन (१५०० पीपीएम) ५ मिलि प्रति लिटर या प्रमाणेफवारणी करावी.चवळीमावा किडीच्या नियंत्रणासाठी थायामेथोक्झाम (२५ डब्ल्यूजी) ०.५ ग्रॅम प्रती लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.सोयाबीनफुलोऱ्याची अवस्थाया काळात स्पोडोप्टेरा लिट्यूरा अळीचा प्रादुर्भाव वाढतो. हे लक्षात घेऊन त्यांच्या सर्वेक्षणासाठी कामगंध सापळे हेक्टरी पाच वापरावते. त्यात स्पोडोल्यूअरचा वापर करावा.वांगीशेंडा व फळे पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीवर असल्यास क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) ०.३ मि.लि. प्रती लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी ५% निंबोळी अर्क किंवा कडुलिंबाचे तेल ५ मि.लि. अधिक डायफेंथ्युरॉन (५० डब्ल्यूपी) १.६ ग्रॅम प्रती लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. (ॲग्रेस्को शिफारस)केळीरस शोषक किडींच्या नियंत्रणासाठी निंबोळी तेल ४ मि.लि. (ॲग्रेस्को शिफारस) किंवा ॲसीफेट (७५ एसपी) १.५ ग्रॅम प्रती लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.०२४२६- २४३२३९प्रमुख, कृषी विद्या विभाग आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.