Farmer Loan waiver: शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसह विविध प्रलंबित प्रश्नांसाठी मंगळवारी (ता. २३) पारनेर तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. खासदार नीलेश लंके मोर्चाचे नेतृत्व करणार असून सर्वपक्षीय कार्यकर्त्याची त्याबाबत बैठक झाली..राज्यातील शेतकरी सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करीत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली. अवकाळी पाऊस, दुष्काळी परिस्थिती, वाढता उत्पादन खर्च, शेतीमालाला मिळत नसलेला हमीभाव आणि वाढती कर्जबाजारीपणाची समस्या यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असल्याचे उपस्थितांनी नमूद केले..Farmers Protest: कर्जमाफी, पीकविम्यासाठी वांगी बु. येथे अन्नत्याग आंदोलन.त्यामुळे शासनाने कोणत्याही अटी-शर्ती न लावता सरसकट कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून त्याच्या न्याय्य हक्कांसाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यासाठी मंगळवारी (ता. २३) पारनेर (जि. अहिल्यानर) येथे तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. .Farmers Protest: आधी नार-पारचे पाणी, मगच कालव्याचे विस्तारीकरण.खासदार निलेश लंके मोर्चाचे नेतृत्व करणार असून बैठकीच्या शेवटी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सर्व संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकरी, युवक, महिला आणि नागरिक सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले. .मोर्चाच्या नियोजनासाठी घेण्यात आलेल्या बैठकीला शेतकरी, अखिल भारतीय काँग्रेस पक्ष, शिवसेना (उबाठा) भूमिपुत्र शेतकरी संघटना, शिवबा संघटना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, संभाजी ब्रिग्रेड, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन आदी पक्ष संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.