Parliament Budget Session 2026 Rahul Gandhi Quotes Naravane Memoir: लोकसभेत सोमवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषण धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेवेळी जोरदार गदारोळ झाला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकातील काही मुद्यांचा उल्लेख करण्याचा प्रयत्न केला. चीन सैन्य भारतीय हद्दीत घुसत असल्याचा त्यांनी दावा केला. त्याला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जोरदार आक्षेप घेतला. गृहमंत्री अमित शहा यांनीही राहुल गांधींच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली. यावरून जोरदार गदारोळ झाल्याने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना सभागृहाचे कामकाज ३ वाजेपर्यंत तहकूब केले. त्यानंतर कामकाज पुन्हा सुरु झाल्यानंतर याच मुद्यावरून गोंधळ दिसून आला. यामुळे कामकाज पुन्हा तहकूब करण्यात आले. .संरक्षण मंत्री राजनाथ सिंह लोकसभेत म्हणाले, "लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ज्या पुस्तकाचा उल्लेख केला ते सभागृहासमोर सादर करावे, अशी माझी इच्छा आहे. कारण ते ज्या पुस्तकाचा उल्लेख करत आहेत ते प्रकाशित झालेले नाही." त्यावर राहुल गांधी यांनी, हे १०० टक्के अधिकृत असल्याचे म्हटले. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधींना केवळ राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच चर्चा करण्याची सूचना केली. पण राहुल यांनी आपले बोलणे सुरुच ठेवले. यावर जोरदार गोंधळ दिसून आला..Union Budget 2026 : केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या वाट्याला काय आले?.भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांच्या भाषणानंतर राहुल गांधी यांनी बोलण्यास सुरुवात केली. ते म्हणाले की, तेजस्वी यांनी काँग्रेस पक्षावर आरोप केले असून, आमच्या देशभक्तीवर सवाल उपस्थित केले आहे. त्यानंतर राहुल यांनी माजी लष्करप्रमुख नरवणे यांच्या पुस्तकाचा उल्लेख करण्यास सुरुवात केली. तुम्हाला समजेल की देशभक्त कोण आहे?. चीनचे ४ रणगाडे कैलास पर्वतरांगांपासून केवळ काही मीटर अंतरावर आले होते, असा दावा राहुल यांनी केला. त्यांनी पुढे नरवणे यांचा उल्लेख करत, त्यात पंतप्रधान आणि संरक्षणमंत्र्यांबद्दल लिहिल्याचे नमूद केले. "मी त्याचा संदर्भ देत आहे," असे राहुल यांनी म्हणताच राजनाथ सिंह यांनी त्याला जोरदार आक्षेप घेतला. ते पुस्तक प्रकाशित झालेले नाही. हे केवळ काल्पनिक असल्याचे संरक्षणमंत्र्यांनी सांगितले. केंद्रीय संसदीय मंत्री किरेन रिजिजू यांनीही राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला..Union Budget 2026: शेती बेदखलच!.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.