Parbhani News: परभणी जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ५४ पैकी ३५ जागांवर म्हणजेच ६४.८१ टक्के जागांवर महिला उमेदवार विजयी झाल्या आहेत. .सर्वसाधारण (खुल्या) गटांमध्ये पुरुष उमेदवारांना पराभूत केल्यामुळे जिल्हा परिषदेतील महिला सदस्यांची संख्या ५० टक्केहून अधिक झाली आहे. सभागृहामध्ये महिलांचे बहुमत असेल..Local Body Results: परभणी ‘झेडपी’ निवडणुकीत भाजपची जोरदार मुसंडी.जिल्हा परिषदेचे ५४ पैकी २७ गट विविध प्रवर्गातील महिलांसाठी राखीव होते. परंतु वझर बुद्रुक, कुपटा, ताडबोरगाव, लिंबा, मरडसगाव, पेठशिवणी,.Local Body Results: लातूर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस किंगमेकर? .ताडकळस या ठिकाणी सर्वसाधारण गटांमध्ये पुरुष उमेदवारांवर मात करून महिला विजयी झाल्या आहेत. त्यामुळे महिला सदस्यांची संख्या ५० टक्केहून अधिक झाली आहे..महिला सदस्यांमध्ये भाजपच्या सर्वाधिक १५ सदस्य आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ९ सदस्य शिवसेनेचे ५ सदस्य, शिवसेना (उबाठा) ४, कॉंग्रेसच्या १ सदस्य तर अपक्ष १ सदस्य आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.