Dead Storage : परभणी पावसाच्या खंडामुळे परभणी जिल्ह्यातील लघू व मध्यम सिंचन प्रकल्पांतील पाणीसाठ्यात वाढ थांबली आहे. गुरुवारी (ता. २७) घेतलेल्या नोंदीनुसार लघू प्रकल्पांमध्ये सरासरी ७.४९० दलघमीनुसार १२ टक्के पाणीसाठा होता. चार लघू प्रकल्पांतील पाणीसाठा अद्याप जोत्याखाली आहे. दोन मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी ५.१२२ दलघमीनुसार १० टक्के पाणीसाठा आहे..मागील महिनाभरापासून पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे प्रकल्पांमध्ये पाण्याची आवक थांबली आहे. बाष्पीभवनाचा वेग वाढला असून पाण्याचा उपसाही सुरू आहे. त्यामुळे सिंचन प्रकल्पांतील पाणीसाठ्यात घट होत आहे..Minor Irrigation Projects : परभणीतील १३ लघू प्रकल्पांचा पाणीसाठा जोत्याखाली.चार लघू प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखालीजिंतूर तालुक्यातील देवगाव, कवड आणि दहेगाव तसेच सोनपेठ तालुक्यातील नखातवाडी या चार लघू सिंचन तलावांतील पाणीसाठा जोत्याखाली आहे. परभणी तालुक्यातील पेडगाव लघू तलावात ३१ टक्के पाणीसाठा आहे. जिंतूर तालुक्यातील जोगवाडा लघू तलावात ४ टक्के, बेलखेडा येथे १ टक्का, वडाळी येथे १० टक्के, चारठाणा येथे १ टक्का, चिंचोली येथे ३ टक्के, आडगाव येथे ६ टक्के, केहाळ येथे ४ टक्के, भोसी येथे ३ टक्के आणि मांडवी येथे ७ टक्के पाणीसाठा आहे..Parbhani Dam Water Update: परभणी जिल्ह्यातील लघु प्रकल्पांत ११, मध्यम प्रकल्पांत ९ टक्के पाणीसाठा.मानवत तालुक्यातील आंबेगाव लघू तलावात ३१ टक्के, तर पाथरी तालुक्यातील झरी लघू तलावात ८६ टक्के पाणीसाठा आहे. गंगाखेड तालुक्यातील टाकळगाव लघू तलावात २ टक्के, कोद्री येथे २१ टक्के, राणीसावरगाव येथे ३८ टक्के, पिंपळदरी येथे ३९ टक्के, डोंगरपिंपळा येथे ४ टक्के आणि भेंडेवाडी येथे २ टक्के पाणीसाठा आहे. पालम तालुक्यातील तांदुळवाडी तलावात ३५ टक्के, तर मंठा तालुक्यातील पाडाळी लघू प्रकल्पात ९ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी २७ ऑगस्ट रोजी लघू प्रकल्पांमध्ये सरासरी १४.७१ दलघमीनुसार ३२.७७ टक्के पाणीसाठा होता..मध्यम प्रकल्पांत सरासरी १० टक्के पाणीसाठाकरपरा मध्यम प्रकल्पाची पूर्ण जलक्षमता २८.८२० दलघमी असून, त्यापैकी उपयुक्त साठवण क्षमता २४.९०० दलघमी आहे. मासोळी मध्यम प्रकल्पाची पूर्ण जलक्षमता ३४.०८५ दलघमी असून, त्यापैकी उपयुक्त साठवण क्षमता २७.१४१ दलघमी आहे. गुरुवारी (ता. २७) घेतलेल्या नोंदीनुसार करपरा मध्यम प्रकल्पात १.०४३ दलघमीनुसार ४ टक्के, तर मासोळी मध्यम प्रकल्पात ४.०७९ दलघमीनुसार १५ टक्के पाणीसाठा होता. दोन्ही मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी ५.१२२ दलघमीनुसार १० टक्के पाणीसाठा होता. गतवर्षी २७ ऑगस्ट रोजी करपरा मध्यम प्रकल्पात १०० टक्के, तर मासोळी मध्यम प्रकल्पात ४३ टक्के पाणीसाठा होता. दोन्ही मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी ७०.०८ टक्के पाणीसाठा नोंदविण्यात आला होता..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.