Sugar Factory Payment Issue: राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि साखरेच्या वाढलेल्या दराच्या पार्श्वभूमीवर मागील (२०२५-२६) हंगामात गाळप केलेल्या उसाला प्रति टन ३०० रुपये अतिरिक्त देयक द्यावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे मंगळवारी (ता. ६) परभणी-गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावर सिंगणापूर फाटा (ता. परभणी) येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले..परभणी जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांनी मागील हंगामात गाळप केलेल्या उसाला प्रति टन केवळ २ हजार ५०० रुपये दर दिला आहे. जिल्ह्यातील सातपैकी दोन साखर कारखान्यांनी ३ हजार रुपयांपर्यंत दर दिला आहे..Sugarcane Crushing Season: ऊस गाळप हंगामापुढील तिढा.उर्वरित पाच कारखान्यांनीही तुलनेने कमी दर दिला. मागील वर्षी स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच इतर संघटनांनी केलेल्या ऊस आंदोलनानंतर पाचपैकी दोन कारखान्यांनी प्रति टन २ हजार ७२५ रुपये दर दिला..Sugarcane Farmers Issues: केंद्र सरकारने ऊस उत्पादकांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे: राजु शेट्टी.गंगाखेड तालुक्यातील जी सेव्हन शुगर्स, आमडापूर (ता. परभणी) येथील श्रीलक्ष्मी नरसिंह शुगर्स आणि सेलू तालुक्यातील श्री. तुळजा भवानी शुगर्स या कारखान्यांनी जाणीवपूर्वक कमी दर दिला आहे. दुष्काळी परिस्थिती आणि साखरेचे वाढलेले दर या पार्श्वभूमीवर या कारखान्यांनी मागील हंगामात तुटलेल्या उसाला प्रति टन ३०० रुपये देणे बंधनकारक आहे..जिल्ह्यातील कारखान्यांनी शेअर्सच्या नावाखाली जमा केलेली अनामत रक्कम २५ हजार रुपये दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तातडीने शेतकऱ्यांना परत द्यावी, अशी मागणी करण्यात आली. या मागण्यांसाठी स्वाभिमानी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष किशोर ढगे यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.