Soybean Value Chain: राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया २०२६-२७ अंतर्गत सोयाबीन व करडई या पिकांसाठी जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पीकनिहाय मूल्य साखळी भागीदार म्हणून शेतकरी उत्पादक कंपनीची निवड करण्यात येणार आहे..निकष पूर्ण करणाऱ्या इच्छुक शेतकरी उत्पादक कंपन्यांनी परिपूर्ण प्रस्ताव शुक्रवार (ता.२१)पर्यंत कार्यालयीन वेळेत संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भास्कर कोळेकर यांनी केले आहे..Soybean Farming: सोयाबीन क्षेत्र वाढीची शक्यता.जिल्हा तेलबिया समितीने निवड केलेल्या मूल्य साखळी भागीदारांमार्फत शेतकरी प्रशिक्षण, प्रमाणित बियाणे वितरण, शेतकरी शेतीशाळा आदी विविध घटक राबविण्यात येणार आहेत. कंपनी कायदा किंवा सहकारी कायद्यांतर्गत संस्थेची नोंदणी झालेली असावी. संबंधित जिल्ह्यात काम करण्याचा किमान तीन वर्षांचा अनुभव असावा..Soybean Seeds Complaints: सोयाबीन बियाण्यांविरोधात तक्रारींचा पाऊस.संस्थेची नोंदणी मार्च २०२३ पूर्वीची असणे आवश्यक आहे. शेतकरी उत्पादक कंपनी किंवा सहकारी संस्थेमध्ये किमान २०० शेतकरी सभासद नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. सहकारी संस्था असल्यास संस्थेच्या उद्दिष्टांमध्ये तेलबिया पिकांबाबत कामकाजाचा उल्लेख असावा. .मागील तीन वर्षांतील सरासरी वार्षिक उलाढाल ९ लाख रुपयापेक्षा अधिक असावी. शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये शेतकऱ्यांचा किमान ३ लाख रुपये समभाग असणे आवश्यक आहे. शासन अनुदानित शेतकरी उत्पादक कंपनी अथवा सहकारी संस्थांना प्राधान्य देण्यात येईल..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.