Government Services: परभणी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी बुधवारी (ता. २२) घेण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ या अभियानाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. या शिबिरात महसूल विभागासह विविध शासकीय विभागांच्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच लाभार्थ्यांना प्रतीकात्मक पद्धतीने विविध योजनांच्या लाभांचे वाटप करण्यात आले..मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात हे शिबिर आयोजित करण्यात आले..Revenue Department: ‘महसूल’च्या कामकाजात पारदर्शकता आणा.कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्षा लता वाकळे, महापौर सय्यद इक्बाल, कृषितज्ज्ञ पद्मश्री दादा लाड, कुलगुरू डॉ. इंद्रमणी मिश्रा, जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर, पोलिस अधीक्षक पंकज कुमावत, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, तहसीलदार डॉ. संदीप राजपुरे आदी उपस्थित होते..Revenue Camp: येहळेगाव सोळंके येथे समाधान शिबिरात २८० प्रमाणपत्र वितरण.जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण म्हणाले, शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ नागरिकांना सुलभ, पारदर्शक आणि वेळेत मिळावा, यासाठी राज्य शासनाने ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियान सुरू केले आहे. शेतकरी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या महसूल व इतर शासकीय सेवांशी संबंधित अडचणी तत्परतेने सोडविण्यात येत आहेत..पद्मश्री दादा लाड यांनी कापूस पिकासाठी विकसित करण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण लागवड तंत्रज्ञानामुळे उत्पादनात लक्षणीय वाढ होऊन अनेक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढल्याचे सांगितले. कुलगुरू डॉ. इंद्रमणी मिश्रा यांनी कृषी विद्यापीठामार्फत विविध उपक्रम, प्रशिक्षण आणि संशोधनाच्या माध्यमातून आधुनिक शेती तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले जात असल्याचे सांगितले. यावेळी शेत-पाणंद रस्ते खुले करण्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल तालुका भूमी अभिलेख उपअधीक्षक सुनील मोरे यांचा तसेच विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बीएलओंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.