Agriculture Officeer Shortage: परभणी येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (सुपरिटेंडन्ट ॲग्रिक्लचरल ऑफिसर: एस.ए.ओ.) पद डिसेंबर २०२४ पासून म्हणजेच तब्बल १६ महिन्यांपासून रिक्त आहे. तसेच जिल्ह्यातील ९ पैकी ४ तालुका कृषी अधिकाऱ्यांची पदे, तसेच इतर मिळून एकूण १५७ पदे रिक्त आहेत. प्रभारी अधिकाऱ्यांना कामकाज रेटत नसल्याचे चित्र आहे. .सक्षम अधिकाऱ्याविना कृषी विभागाच्या कामकाजासह योजनांच्या अंमलबजावणीत गतीमानता नाही. शेतकऱ्यांना वेळेवर योजनांचा लाभ मिळण्यासाठी अडचणी येत आहेत. ११ मार्च २०२४ रोजी अनिल गवळी हे नियमित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी म्हणून रजू झाले. एसएओ म्हणून प्रथमच तरुण अधिकारी मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. परंतु त्यांना जिल्ह्यात काम करण्यात रस नव्हता. ते सतत रजा घेत राहिले..DNA Seed Testing: बियाण्यांची ‘डीएनए टेस्ट’ चालू खरिपापासून होणार: कृषी विभाग.अखेर २७ डिसेंबर २०२४ रोजी गवळी यांची बदली झाली. तेव्हापासून कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्माचे) प्रकल्प संचालक दौलत चव्हाण यांच्याकडे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदाचा प्रभार आहे. दरम्यान,३१ मार्च २०२५ च्या आदेशाद्वारे कृषी आयुक्तालयातील कृषी उपसंचालक (विस्तार व प्रशिक्षण) पूनम खटावकर यांची परभणी येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदी पदन्नोतीने पदस्थापना झाली..परंतु त्या परभणी येथे रुजू झालेल्या नाहीत. त्यामुळे चव्हाण यांच्याकडे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदाचा प्रभार कायम आहे. परंतु मागील वर्ष दीड वर्षाच्या कालावधीत योजनांच्या लाभासाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून अर्थपूर्ण अडवणूक केली जात असून पात्र असतानाही जाणीवपूर्वक डावलले जात असल्याच्या तोंडी तक्रारी शेतकरी करत आहेत..Farmer Suicides: आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात ‘एसएओ’ पद रिक्त.आत्माचे प्रकल्प संचालक आणि एसएओ या दोन कार्यालयाच्या अखत्यारितील कामकाजाबद्दल शेतकऱ्यामधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. विशेषतः पिकविमा योजनेअंतर्गंत विमा परताव्याचा लाभ, बियाणे, खते निविष्ठांचे गुणवत्ता नियंत्रण तसेच सूक्ष्म सिंचन, नैसर्गिक शेती अभियान यासह विविध योजनेअतर्गत अनुदानाच्या प्रलंबित प्रकरणाचा निपटारा होत नसल्याबद्दल शेतकऱ्यांचा रोष आहे..कृषी विभागातील १५७ पदे रिक्त...आकृतिबंधानुसार परभणी जिल्ह्यात कृषी विभागासाठी ६४० पदे मंजूर आहेत. त्यापैकी ४८३ भरलेली आहेत. विविध संवर्गातील १५७ पदे रिक्त आहेत. त्यात जिंतूर, सेलू, गंगाखेड, पालम येथील तालुका कृषी अधिकारी तसेच जिल्हा बीज परीक्षण अधिकारी, जिल्हा मृदा परिक्षण अधिकारी ही पदे रिक्त आहेत. कृषी अधिकाऱ्यांची २, मंडळ कृषी अधिकाऱ्यांची ४, सहायक कृषी अधिकाऱ्यांची २३ पदे रिक्त आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.