Parbhani News : खरीप हंगाम २०२५ मधील अंतिम पेरणी क्षेत्रानुसार परभणी जिल्ह्यात ५ लाख १२ हजार २१३ हेक्टरवर (९८.७९ टक्के) पेरणी झाली आहे. गतवर्षीच्या (२०२४ ) तुलनेत यंदा खरिपाच्या एकूण पेरणीत १५ हजार ६९७ हेक्टरने घट झाली. तर सोयाबीनच्या पेरणीत ११ हजार ४३३ हेक्टरने तर कपाशीच्या लागवडीत ३ हजार २८४ हेक्टरने घट झाली आहे. .तूर, मूग, ज्वारी, बाजरीच्या पेरणीतील घट यंदाही कायम आहे. यंदाच्या खरीप हंगामातील पेरणी क्षेत्र गुरुवारी (ता. २१) अंतिम करण्यात आले अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण, तंत्राधिकारी (सांख्यिकी)पूजा थिटे यांनी दिली..Kharif Sowing 2025: सांगली जिल्ह्यात खरीप पेरणी ९५ टक्क्यांवर.जिल्ह्यात सोयाबीनचे सरासरी क्षेत्र २ लाख ५४ हजार ३८२ हेक्टर असताना यंदा प्रत्यक्षात २ लाख ६९ हजार ७३९ हेक्टरवर (१०६.०४ टक्के) पेरणी झाली. पाथरी, गंगाखेड,पालम या तालुक्यात सरासरीहून कमी तर परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, सोनपेठ,पूर्णा या तालुक्यात सरासरीहून अधिक सोयाबीनचा पेरा झाला आहे. .कपाशीचे सरासरी क्षेत्र १ लाख ९१ हजार ९५४ हेक्टर असताना यंदा प्रत्यक्षात १ लाख ९४ हजार ७०२ हेक्टर (१०१.४३ टक्के) लागवड झाली आहे. सेलू, पाथरी, सोनपेठ या तालुक्यांत सरासरीहून कमी, तर परभणी, जिंतूर, मानवत, गंगाखेड, पालम, पूर्णा या तालुक्यांत सरासरीहून अधिक कपाशीची लागवड झाली..Kharif Sowing : पुणे विभागात १०९ टक्के पेरणी पूर्ण.तुरीची ४२ हजार ६०२ हेक्टर पैकी ३७ हजार ३१० हेक्टर (८७.५८ टक्के), मुगाची १७ हजार ६०० पैकी ६ हजार ३१ हेक्टर (३४.२७ टक्के), उडदाची ६ हजार ४१३ पैकी २ हजार ९१ हेक्टर (३२.६१ टक्के) पेरणी झाली. गतवर्षीच्या तुलनेत तुरीच्या पेऱ्यात १ हजार ७५५ हेक्टरने, मुगाच्या पेऱ्यात ५२ हेक्टरने घट झाली, तर उडदाच्या पेऱ्यात १ हजार १३ हेक्टरने वाढ झाली. .ज्वारीची ३ हजार ८५७ पैकी ७९७ हेक्टर (२०.६६ टक्के), बाजरीची ४९९ पैकी १११ हेक्टर (२२.२१ टक्के), मक्याची ९८३ पैकी ५२५ हेक्टर (५३.४२ टक्के) पेरणी झाली. गतवर्षीच्या तुलनेत ज्वारीच्या पेरणीत २८१ हेक्टरने, बाजरीच्या पेऱ्यात ७८ हेक्टरने घट, तर मक्याच्या पेऱ्यात ५५ हेक्टरने वाढ झाली. तिळाच्या पेरणीत वाढ तर कारळामध्ये घट झाली.शेतकऱ्यांचा कल हळद व ऊस लागवडीकडे असल्यामुळे यंदा खरिपाच्या पेरणीत घट झाल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.