Drinking Water Crisis: परभणी जिल्ह्यातील चार लघू सिंचन तलाव कोरडे पडले असून, तीन तलावांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. सध्या लघू सिंचन प्रकल्पांमध्ये सरासरी १९ टक्के, तर मध्यम प्रकल्पांमध्ये २४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पाणीपुरवठा करणारे जलस्रोत आटत असल्याने अनेक गावांमध्ये पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे..उन्हाचा चटका वाढत असून तापमानाचा पारा ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. बाष्पीभवन, उपसा आणि गळती यामुळे लघू तसेच मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. जायकवाडी पाटबंधारे विभागांतर्गत परभणी व जालना जिल्ह्यांतील २१ लघू सिंचन प्रकल्पांची एकूण जलसाठा क्षमता ४५.८२७ दलघमी असून, उपयुक्त साठा क्षमता ४२.२०५ दलघमी आहे.पाटबंधारे विभागाने गुरुवारी (ता. १४) घेतलेल्या पाणीपातळी नोंदीनुसार, लघू प्रकल्पांमध्ये ७.०६५ दलघमी म्हणजेच १९ टक्के, तर दोन मध्यम प्रकल्पांमध्ये १२.३६१ दलघमी म्हणजे २४ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता..Water Scarcity: मंचर शहरावर पाणीटंचाईचे सावट.चार लघू तलाव कोरडेजिंतूर तालुक्यातील जोगवाडा, चिंचोली, आडगाव आणि केहाळ हे चार लघू तलाव पूर्णपणे कोरडे पडले आहेत. तर देवगाव, चारठाणा आणि बेलखेडा येथील तलावांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे..Hingoli Water Scarcity: पाणीटंचाई निवारणार्थ २८ गावांमध्ये ३६ नवीन विंधन विहिरीना मंजुरी.वडाळी तलावात ५ टक्के, भोसीत ४ टक्के, कवडमध्ये ६ टक्के, मांडवीत २ टक्के, दहेगावमध्ये २ टक्के, तर जालना जिल्ह्यातील पाडाळी तलावात १२ टक्के पाणीसाठा आहे. पेडगाव तलावात ४५ टक्के, आंबेगावमध्ये ४१ टक्के आणि पाथरी तालुक्यातील झरी तलावात ७६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. सोनपेठ तालुक्यातील नखातवाडी तलावात ११ टक्के, पालम तालुक्यातील तांदुळवाडी तलावात १६ टक्के, गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव तलावात ३१ टक्के, टाकळगाव तलावात ८ टक्के, कोद्री तलावात ११ टक्के, तर पिंपळदरी तलावात ५३ टक्के पाणीसाठा नोंदविण्यात आला आहे. मागील वर्षी, १४ मे २०२५ रोजी लघू प्रकल्पांमध्ये सरासरी ४.४४४ दलघमी म्हणजेच १५ टक्के पाणीसाठा होता..मध्यम प्रकल्पांत २४ टक्के पाणीसाठाकरपरा मध्यम प्रकल्पाची पूर्ण जलसाठा क्षमता २८.८२० दलघमी असून, उपयुक्त साठा क्षमता २४.९०० दलघमी आहे. मासोळी मध्यम प्रकल्पाची पूर्ण क्षमता ३४.०८५ दलघमी असून, उपयुक्त साठा २७.१४१ दलघमी आहे. गुरुवारी (ता.१४) घेतलेल्या नोंदीनुसार, करपरा प्रकल्पात ३.३६६ दलघमी म्हणजे १४ टक्के, तर मासोळी प्रकल्पात ५.९७४ दलघमी म्हणजे २२ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होता. दोन्ही मध्यम प्रकल्पांमध्ये मिळून सरासरी ८.९९५ दलघमी म्हणजे २४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी १४ मे २०२५ रोजी करपरा प्रकल्पात १२ टक्के, तर मासोळी प्रकल्पात २२ टक्के पाणीसाठा होता..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.