Parbhani News: उन्हाळी हंगाम २०२६ मध्ये गुरुवारपर्यंत (ता. ६) परभणी, हिंगोली जिल्ह्यांत ९ हजार ५४२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यात भुईमुगाची ७ हजार ८६५ हेक्टर पेरणी आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली..परभणी जिल्ह्यात उन्हाळी पिकांची १२ हजार ३०२ हेक्टरपैकी २ हजार ७७७ हेक्टर (२२.५८ टक्के) पेरणी झाली आहे. तेलबियांची १० हजार ५८८ पैकी २ हजार १९३ हेक्टरवर (२०.७२ टक्के) पेरणी झाली. त्यात भुईमुगाची ७ हजार २३४ पैकी २ हजार ९९ हेक्टर (२९.०२ टक्के), सोयाबीनची ३ हजार २३३ पैकी २८.२ हेक्टर (०.८७ टक्के), तिळाचे सरासरी क्षेत्र १४.३५ हेक्टर असतांना ६६.१० हेक्टर (४६० टक्के) पेरणी झाली आहे. .Summer Crop Sowing : देशात उन्हाळी पेरणीत भात-मका पिछाडीवर; भुईमूग-बाजरीने घेतली आघाडी.कडधान्यांची ५८.२८ पैकी २०.५ हेक्टर (३५.१८ टक्के) पेरणी झाली आहे. त्यात मुगाची ५८.२८ पैकी २०.५ हेक्टर (३५.१८ टक्के) पेरणी झाली आहे. तृणधान्यांची १ हजार ६५४ पैकी ५८३ हेक्टर (३४.०५ टक्के) पेरणी झाली..Summer Crop Sowing : उन्हाळी पिकांची १९ हजार ४२९ हेक्टरवर पेरणी.त्यात ज्वारीची ७१.८ हेक्टर, मक्याची १ हजार ३५४ पैकी २८४ हेक्टर (२१.०३ टक्के), बाजरीची ३०० पैकी २०६ हेक्टर (६८.७९ टक्के) पेरणी झाली आहे. हिंगोली जिल्ह्यात उन्हाळी पिकांची १२ हजार ७०५ हेक्टर पैकी ६ हजार ७६५ हेक्टरवर (५३.२४ टक्के) पेरणी झाली आहे. तेलबियांची १० हजार ७१९ पैकी ५ हजार ७६६ हेक्टरवर (५३.७९ टक्के) पेरणी झाली..त्यात भुईमुगाची ६ हजार १९० पैकी ५ हजार ६७२ हेक्टर (९१.६३ टक्के), सोयाबीनची ३ हजार ६८८ पैकी १४ हेक्टर (०.३७ टक्का), तिळाची १० हेक्टर तर सूर्यफुलाची ९.१० हेक्टरवर पेरणी झाली आहे. कडधान्यांची ५३७ पैकी २६४ हेक्टर (४९.१६ टक्के) पेरणी झाली. त्यात मुगाची २४१ हेक्टर, उडदाची ३० हेक्टर पेरणी झाली. तृणधान्यांची १ हजार ४४८ पैकी ६४४ हेक्टरवर (४४.४७ टक्के) पेरणी झाली. त्यात ज्वारीची ३३६ हेक्टर, मक्याची २७८ हेक्टरवर पेरणी झाली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.