Rainfall Update: ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात (१ ते १५ ऑगस्ट) परभणी जिल्ह्यात अपेक्षित १२४.९ मिमी पावसाच्या तुलनेत प्रत्यक्ष केवळ ३७.७ मिमी पर्जन्य नोंदवला गेला. हिंगोली जिल्ह्यातही अपेक्षित १३२.३ मिमीऐवजी फक्त ४९.४ मिमी पाऊस झाला. परिणामी परभणीमध्ये ८७.२ मिमी आणि हिंगोलीमध्ये ८२.९ मिमी इतकी पावसाची कमतरता राहिली. या दोन्ही जिल्ह्यांतील एकूण ८२ मंडलांपैकी १९ मंडलांत २५ मिमीपेक्षा कमी पाऊस झाला, तर फक्त एका मंडलातच १०० मिमीपेक्षा जास्त पर्जन्यवृष्टी झाली..परभणीत सर्वच मंडलांत तूटऑगस्टमध्ये शनिवार (ता. १५)पर्यंत परभणी जिल्ह्यातील सर्व ५२ मंडलांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. यापैकी १७ मंडलांत २५ मिमीपेक्षा कमी पाऊस झाला. पिंपळदरी (ता. गंगाखेड) मंडलात सर्वांत कमी ८.३ मिमी, तर जांब (ता. परभणी) मंडलात सर्वाधिक ८५.९ मिमी पाऊस झाला.हिंगोली जिल्ह्यातील सर्व ३० मंडलांतही सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. कुरुंदा (ता. वसमत) मंडलात सर्वांत कमी २०.५ मिमी, तर वाकोडी (ता. कळमनुरी) मंडलात सर्वाधिक १०२.३ मिमी पाऊस नोंदला गेला..Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस.२५ मिमीपेक्षा कमी पाऊसपरभणी जिल्हा : जिंतूर २०.६, सेलू १३.६, वालूर १७.६, मानवत २४.५, केकरजवळा १३.७, कोल्हा १८.६, बाभळगाव १३.३, हादगाव १३.७, कासापुरी १७.५, सोनपेठ ११.२, आवलगाव १९.५, शेळगाव १९.५, वडगाव १०, राणीसावरगाव १९.७, माखणी २१.८, पिंपळदरी ८.३, चाटोरी १९.७.हिंगोली जिल्हा : कुरुंदा २०.५, येळेगाव २१.७.२५.१ ते ५० मिमी पाऊस.Parbhani Rain Update: परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ८२ मंडलात हलका ते मध्यम पाऊस.परभणी जिल्हा : परभणी ४६.३, परभणी ग्रामीण ४६.८, पेडगाव ४८.८, झरी ४९.५, दैठणा ३५.४, टाकळी कुंभकर्ण ४२.१, बोरी ४५.५, आडगाव २६, चारठाणा २९.२, वाघी धानोरा ४५.६, दूधगाव ३३.३, देऊळगाव गात ३३.१, कुपटा ३२.५, चिकलठाणा ३४.७, मोरेगाव ४१.३, ताडबोरगाव ४५.८, रामपुरी २५.३, गंगाखेड ४९, महातपुरी २५.९, रावराजूर २६.७, लिमला ४०.८, कात्नेश्वर ४५.५.हिंगोली जिल्हा : डिग्रस कऱ्हाळे ४७.३, नांदापूर ३७.४, आखाडा बाळापूर ४३.२, डोंगरकडा ३१.५, वारंगा ४८, वसमत ४२.८, आंबा २५.५, हयातनगर ३३, हट्टा २९.४, टेंभुर्णी २५.४, औंढानागनाथ ३०.३, साळणा २९.६, जवळा बाजार २५.४, साखरा ४२.२, पानकन्हेरगाव ४६.८..५० मिमीपेक्षा अधिक पाऊसपरभणी ः जांब ८५.९, सिंगणापूर ७०.४, पिंगळी ६७.५, सावंगी म्हाळसा ५२.५, बामणी ५५.८, पाथरी ५४.५, पालम ७४.४, बनवस ५७.२, पेठशिवणी ५१, पूर्णा ७०, ताडकळस ५६.४, चुडावा ६९.५ आणि कावलगाव ५८.८ मिमी पाऊस झाला.हिंगोली ः हिंगोली ५९, नरसी नामदेव ७४.१, सिरसम ५०.२, बासंबा ५६, माळहिवरा ५४.३, खंबाळा ७५.३, कळमनुरी ६५.७, गिरगाव ८४.७, सेनगाव ६६.५, गोरेगाव ७१.६, आजेगाव ९०.३ आणि हत्ता ५२.५ मिमी पाऊस झाला.१०० मिमीपेक्षा अधिकहिंगोली ः वाकोडी मंडलात १०२.३ मिमी पाऊस झाला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.