Parbhani News : जिल्ह्यात खरीप २०२५ मध्ये पीककर्ज वाटपाचे १ हजार ५११ कोटी ६० लाख रुपये उद्दिष्ट आहे. ३१ ऑगस्ट अखेरपर्यंत ७९ हजार ७५१ शेतकऱ्यांना ७०८ कोटी ९३ लाख रुपये पीककर्ज वाटप झाल्यामुळे ४६.९० टक्के उद्दिष्ट साध्य झाले. केवळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने उद्दिष्टपूर्ती केली आहे. .परंतु राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका, महाराष्ट्र ग्रामीण बँकेना सप्टेंबरअखेर उर्वरित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वाटपाची गती वाढवावी लागले, अन्यथा उद्दिष्टपूर्ती दूर राहू शकते. यंदा ३१ ऑगस्ट अखेरपर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २१० कोटी रुपये उद्दिष्ट असतांना २१६ कोटी ७ लाख रुपये पीककर्ज वाटप केले. .जिल्हा बँकेने आजवर ८०७ शेतकऱ्यांना ३ कोटी ९९ लाख रुपये नवीन पीककर्ज दिले असून ३९ हजार ७१९ शेतकऱ्यांनी २१२ कोटी ८ लाख रुपये एवढ्या पीककर्जाचे नूतनीकरण करुन घेतले. .Crop Loan : पीक कर्ज वितरणात ‘डीसीसी’चा वाढता आलेख.महाराष्ट्र ग्रामीण बँकेने ३३९ कोटी १३ लाख रुपये पैकी २१४ कोटी ४७ लाख रुपये पीककर्ज वाटप केले. त्यात २ हजार ८२२ शेतकऱ्यांना २९ कोटी १६ लाख रुपये नवीन पीककर्ज, तर १६ हजार १५० शेतकऱ्यांनी १८५ कोटी ३१ लाख रुपये पीककर्जाचे नूतनीकरण करुन घेतेले आहे. .Crop Loan : आठ हजार ९४६ शेतकऱ्यांना १२२ कोटींचे नवीन पीककर्ज .राष्ट्रीयीकृत (व्यापारी) बँकांनी ८२७ कोटी ३३ लाख रुपये पैकी २५१ कोटी १२ लाख रुपये पीककर्ज वितरित केले. त्यात ६ हजार ३५९ शेतकऱ्यांना ९० कोटी १६ लाख रुपये नवीन पीककर्ज असून, १२ हजार ६७८ शेतकऱ्यांनी १६० कोटी ९६ लाख रुपये पीककर्जाचे नूतनीकरण केले आहे. .खासगी बँकांनी १३५ कोटी १४ लाख रुपयांपैकी २७ कोटी २७ लाख रुपये पीककर्ज वाटप केले त्यात ७५९ शेतकऱ्यांना २२ कोटी ९५ लाख रुपयांचे नवीन पीककर्ज असून, २७७ शेतकऱ्यांनी ४ कोटी ३२ लाख रुपये पीककर्जाचे नूतनीकरण केले आहे. २०२४ मध्ये ३१ ऑगस्ट अखेरपर्यंत ७७ हजार ९७७ शेतकऱ्यांना ६२९ कोटी २४ लाख रुपये (४२.७८ टक्के) पीककर्ज केले होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.