Parbhani News : खरीप हंगाम २०२५ मध्ये (एप्रिल ते सप्टेंबर) परभणी जिल्ह्यात बँकांना १ हजार ५११ कोटी ६० लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट असतांना प्रत्यक्षात ८६ हजार २१४ शेतकऱ्यांना ७८४ कोटी ३७ लाख रुपये वाटप करुन ५१.८९ टक्के उद्दिष्ट साध्य झाले. सलग सहाव्यावर्षी पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट अपूर्ण राहिले आहे. .यंदा केवळ परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी (पीडीसीसी) बँकेने १०५.७५ टक्के म्हणजेच उद्दिष्टापेक्षा जास्त वाटप केले. त्यानंतर पीक कर्जवाटपात महाराष्ट्र ग्रामीण बँक, राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका असा क्रम आहे. गतवर्षीच्या (२०२४) तुलनेत यंदा ८८ कोटी २५ लाख रुपये अधिक वाटप झाले आहे..Crop Loan : पीक कर्जवाटपात ९०० कोटींची घट.परभणी जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात राष्ट्रयीकृत, ग्रामीण, सहकारी, खाजगी मिळून एकूण १७ बँकांना १ हजार ५११ कोटी ६० लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यात सर्व राष्ट्रयीकृत बँकांना (व्यापारी बँका) मिळून एकूण ८२७ कोटी ३३ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बँकेला ३३९ कोटी १३ लाख रुपये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला २१० कोटी रुपये, खाजगी बँकांना १३५ कोटी १४ लाख रुपये उद्दिष्ट होते. मंगळवारी (ता. ३०) अखेर पर्यंत परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ४१ हजार ८६२ शेतकऱ्यांना २२२ कोटी ८ लाख रुपये (१०५.७५ टक्के) म्हणजेच उद्दिष्टापेक्षा जास्त वाटप केले..महाराष्ट्र ग्रामीण बँकेने २० हजार ८२२ शेतकऱ्यांना २३४ कोटी ४४ लाख रुपये (६९.१३ टक्के) तर राष्ट्रयीकृत बँकांनी २२ हजार ३०० शेतकऱ्यांना २९५ कोटी ८ लाख रुपये पीककर्ज वाटप करुन ३५.६७ टक्के उद्दिष्ट साध्य केलेत. खाजगी बँकांनी १ हजार २३० शेतकऱ्यांना ३२ कोटी ७७ लाख रुपये पीककर्ज वाटत २४.२५ टक्के उद्दिष्ट साध्य केले..Crop Loan : कर्ज वितरणात जिल्हा बँकांची आघाडी.नवीन पीककर्ज वाटपात वाढ....यंदा १५ हजार १७१ शेतकऱ्यांना १९४ कोटी ३६ लाख रुपये नवीन पीककर्ज वाटप करण्यात आले तर एकूण ७१ हजार ४३ शेतकऱ्यांनी ५९० कोटी रुपये रकमेच्या पीककर्जाचे नूतनीकरण करून घेतले आहे. .२०२४ मध्ये १० हजार ३६४ शेतकऱ्यांना १०९ कोटी ५८ लाख रुपये नवीन पीककर्ज वाटप करण्यात आले होते तर ७५ हजार ४३६ शेतकऱ्यांनी ५८६ कोटी ५४ लाख रुपये रकमेच्या पीककर्जाचे नूतनीकरण करून घेतले होते. एकूण ८५ हजार ८०० शेतकऱ्यांना ६९६ कोटी १२ लाख रुपये (४७.३२ टक्के) वाटप करण्यात आले होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.