Orchard Loss: वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने फळबागेतील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. विशेषतः सिरसाव परिसरातील शेतकऱ्यांना या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसला असून, अनेकांच्या उभे पीक अक्षरशः आडवे झाल्याने शेतकरी हताश झाले आहेत..सिरसाव येथील शेतकरी तानाजी मिसाळ यांच्या शेतातील तब्बल नऊ एकरांवरील पपईची बाग अवकाळी पावसामुळे पूर्णतः जमीनदोस्त झाली. .Papaya Crop Damage : बाजारभाव नसल्याने तीन एकरांतील पपईवर फिरवला ट्रॅक्टर.वादळी वाऱ्यांसह झालेल्या मुसळधार पावसाने झाडे उन्मळून पडल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याशिवाय परिसरातील इतर शेतकऱ्यांच्या पेरू, मका, केळी, आंबा आदी पिकांनाही मोठा फटका बसला आहे..Papaya Crop Damage : शिवलीत पपई बागांचे पावसाने नुकसान.जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांनी प्रत्यक्ष शेतात भेट देऊन नुकसानीची पाहणी करीत परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या..तसेच संबंधित अधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक, तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांसोबत मोबाईलद्वारे संपर्क साधत तातडीने माहिती देऊन नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे त्वरीत करण्याच्या सूचना केल्या. सावंत यांनी प्रशासनाने तत्काळ हालचाली करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.