Buldana News : ‘देवाची करणी... नारळात पाणी’ अशी एक म्हण परिचित आहे. पण, तालुक्यातील खरबडी शिवारात यंदा लागवड केलेल्या पपईमध्ये पाणी निघत असल्याने शेतकऱ्याची चिंता वाढली आहे. हा अजब प्रकार तज्ज्ञांनाही हैराण करणार आहे. .पपई लागवड करणारे शेतकरी राजेंद्र जगन्नाथ किनगे यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. राजेंद्र किनगे हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांनी चार एकर बागायती शेती आहे. त्यापैकी जवळपास एक एकरात त्यांनी डिसेंबर महिन्यात ८०० पपई रोपांची लागवड करण्यात आली होती. .बेड व मल्चिंग टाकून त्यावर लागवड केली. हे पीक चांगल्या व्यवस्थापनातून त्यांनी मोठे केले. नियमित खत, फवारणी व संगोपनामुळे फळेही लागली. मागील महिन्यात पपई पिकण्यास सुरुवात झाली. .Papaya Farming : खानदेशात पपई पीक फळकाढणीवर.सुरुवातीला दोन-तीन फळे तोडून घरी नेल्यावर त्यात नारळाप्रमाणे पाणी असल्याचे आढळले. सुरुवातीला हा योगायोग आहे असे वाटले; मात्र नंतरही प्रत्येक पिकलेल्या पपईमध्ये पाणी निघत असल्याचे लक्षात आले..व्यापाऱ्यांनी दिला नकारकिनगे यांनी व्यापाऱ्यांशी बागेचा सौदा केला होता. परंतु पपईमध्ये पाणी निघत असल्याचे समजल्यानंतर व्यापाऱ्यांनी खरेदीस नकार दिला. त्यामुळे परिपक्व झालेली २० ते २५ क्विंटल पपई मजूर लावून काढून टाकावी लागली. परिणामी, शेतकऱ्यांचे अंदाजे चार लाखांचे नुकसान झाले आहे. .Papaya Farming : पपई रोपांच्या आगाऊ नोंदणीला प्रतिसाद.संपूर्ण तालुक्यात पपईच्या फळांमध्ये पाणी निघाल्याची घटना चर्चेचा विषय ठरली आहे. याबाबत कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठ तज्ज्ञांची बोलून याबाबत माहिती घेतली असता त्यांनाही अचंबित होत आहे. नेमकी कुठल्या कमतरतेमुळे हे घडत असावे याबाबत तर्कविर्तक लावला जात आहे. कुणीही ठोस कारण देत नाही..फळ पिकायला आले की त्यात पाणी निघते. या बागेवर आतापर्यंत सव्वा लाख रुपये केला आहे. गेल्यावर्षीही लागवड केली होती. तेव्हा चांगले पीक आले. या वर्षी वाण बदलून रोपांची लागवड केली तर पपईच्या फळात पाणी निघत असल्याने कुणी खायलाही तयार नाही. नामांकित खासगी कंपनीचे हे वाण असून या प्रकाराने आमच्या कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे.- राहुल किनगे, पपई उत्पादक शेतकरी, खरबडी, जि. बुलडाणा.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.