Khandesh Farming Update: खानदेशात पपईची लागवड यंदा सुमारे ४०० हेक्टरने वाढली आहे. लागवड एकूण १३ हजार हेक्टरवर पोचली आहे. सर्वाधिक सहा हजार हेक्टर एवढी लागवड एकट्या शहादा तालुक्यात झाली आहे. .जळगाव जिल्ह्यात सुमारे चार हजार आणि धुळे जिल्ह्यातही सुमारे दोन हेक्टरवर लागवड झाली आहे. यंदा फेब्रुवारी अखेरपासून लागवडीस सुरवात झाली आहे. लागवड एप्रिलच्या सुरवातीपर्यंत झाली. मागील वेळेस खानदेशात सुमारे १२ हजार ६०० हेक्टरवर लागवड झाली होती. यंदाची लागवड वाढल्याने पपईची रोपे व क्रॉप कव्हरचीदेखील मागणी वाढली आहे..Papaya Crop Damage: पपईची बाग जमीनदोस्त.शहादा तालुक्यातील लागवड स्थिर आहे. परंतु नंदुरबारमधील तळोदा, धुळ्यातील शिरपूर, जळगावमधील चोपडा, यावल व जळगाव तालुक्यांत किंचित लागवड वाढली आहे. या सर्व भागात मिळून लागवड सुमारे ४०० हेक्टरने वाढली आहे. पपईची लागवड तापी, गिरणा, अनेर, पांझरा, बोरी नदीच्या क्षेत्रात सुरवातीपासून केली जाते. यंदाही ही लागवड याच भागात अधिक झाली आहे..Papaya Cultivation: आगाप पपई लागवड आठ हजार हेक्टरवर.पाऊसमान मागील काही वर्षे चांगले राहीले आहे. यामुळे लागवड मागील दोन वर्षे स्थिर होती. तर त्यात यंदा किंचित किंवा काहीशी वाढ झाली आहे. लागवडीसाठी अधिक कालावधी उत्पादन देणाऱ्या व विषाणूमुक्त वाणांना शेतकरी पसंती देत आहेत. उष्णता वाढली आहे. धुळे, नंदुरबार व जळगावातील तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोचले आहे. अशा स्थितीत कोवळी रोपे वाचविण्यासाठी योग्य सिंचन व्यवस्थापनासह उष्णतेपासून संरक्षणासाठी पिकाभोवती क्रॉप कव्हर लावले जात आहेत. यासाठी अतिरिक्त खर्च येत आहे.रोपांचे दर स्थिरपपईची तयार रोपे रोपवाटिकांमधून शेतकऱ्यांनी घेतली आहेत. प्रतिरोप १० ते १४ रुपये दर द्यावे लागले आहेत. काही मोठ्या कंपन्यांनीदेखील रोपांचा पुरवठा केला आहे. लागवड दीड फूट उंच गादीवाफा, आठ किंवा नऊ फूट बाय सहा किंवा सात फूट या अंतरात करण्यात आली आहे. कमाल पपई उत्पादकांनी काळी कसदार, मध्यम जमीन लागवडीसाठी निवडली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.