Crop Diversification: खानदेशातील पपई लागवड यंदा पूर्ण झाली असून एकूण क्षेत्र सुमारे १४ हजार हेक्टरवर पोहोचल्याचा अंदाज आहे. पपई लागवडीत आघाडीवर असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात लागवड जवळपास स्थिर राहिली असताना जळगाव जिल्ह्यात मात्र क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे..गेल्या हंगामात पपईला समाधानकारक दर मिळाले नव्हते. नोव्हेंबरमध्ये प्रतिकिलो ७ ते ८ रुपये दर मिळत असताना डिसेंबरपासून दरात घसरण झाली. डिसेंबर ते फेब्रुवारीदरम्यान अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना प्रतिकिलो सरासरी ३ रुपये दर मिळाला. त्यामुळे पिकाची काढणीही काही भागांत प्रभावित झाली होती. परिणामी यंदा नंदुरबारातील लागवड कमी होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता..Papaya Cultivation: पपई लागवड क्षेत्र १५ हजार हेक्टरवर पोहोचण्याचा अंदाज.खानदेशात नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक पपई लागवड केली जाते. शहादा तालुका पपई उत्पादनाचा प्रमुख पट्टा मानला जातो. धुळे जिल्ह्यातही पपईचे क्षेत्र लक्षणीय आहे. जळगाव जिल्ह्यात पूर्वी चोपडा व रावेर तालुक्यांपुरती मर्यादित असलेली लागवड यंदा यावल, मुक्ताईनगर, जामनेर, जळगाव, पाचोरा, भडगाव आणि धरणगाव भागातही विस्तारली आहे..Khandesh Papaya Cultivation: खानदेशात पपई लागवडीत वाढ.चोपडा तालुक्यातील क्षेत्रात सुमारे २०० ते २५० हेक्टरची वाढ झाल्याचा अंदाज आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये प्रथमच व्यावसायिक स्तरावर पपई लागवड करण्यात आल्याचे सांगितले जाते..जळगावात ४ हजार हेक्टरपर्यंत क्षेत्रजळगाव जिल्ह्यात यंदा पपई लागवडीत मोठी वाढ झाली आहे. जानेवारीपासून सुरू झालेली लागवड मेअखेरपर्यंत सुरू होती. लागवडीसाठी लागणाऱ्या रोपांचा पुरवठा धाराशिव, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक तसेच स्थानिक रोपवाटिकांतून झाला. यंदा रोपांचे दर प्रतिरोप ९ ते १३ रुपये होते. जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतील एकूण पपई क्षेत्र सुमारे साडेसहा हजार हेक्टर असून त्यापैकी जळगाव जिल्ह्यातील क्षेत्र सुमारे ४ हजार हेक्टरपर्यंत पोहोचल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.