Pandharpur News: श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरातील प्रस्तावित कॉरिडॉरच्या कामाला आता प्रशासकीय पातळीवर वेग आला आहे. या प्रकल्पाचे महत्त्वपूर्ण सादरीकरण नुकतेच सोमवारी (ता.२३) मुंबईत ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या दालनात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. काशी आणि उज्जैनच्या धर्तीवर पंढरपूरचा कायापालट करण्याचा संकल्प या माध्यमातून करण्यात आला आहे..या बैठकीत कॉरिडॉरच्या प्रस्तावित कामांचे सविस्तर सादरीकरण करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने अनेक बाबींचा समावेश आहे, त्यात भाविकांच्या सोयीसाठी प्रदक्षिणा मार्गाचे रुंदीकरण, चंद्रभागा नदीच्या पैलतीरावरील ६५ एकर परिसराचा विकास, चंद्रभागा नदीवर भाविकांच्या दळणवळणासाठी नवीन पुलाची निर्मिती आणि दर्शन रांगेपासून ते विसाव्यापर्यंतच्या आधुनिक सोयीसुविधांचा समावेश आहे..Pandharpur Temple Corridor: कॉरिडॉरमध्ये बाधित होणारी मंदिरे, समाध्यांची घेतली माहिती.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 'ड्रीम प्रोजेक्ट' असलेल्या या कॉरिडॉरमुळे पंढरपूरच्या धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच या प्रकल्पाचा आढावा घेण्यात आल्याने निधी आणि प्रशासकीय मंजुरीच्या प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता आहे..या बैठकीस आमदार समाधान आवताडे, सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्यासह मंत्रालयातील विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते..विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अधिक चांगल्या सोयीसुविधा मिळाव्यात, हा मुख्यमंत्र्यांचा संकल्प आहे. कॉरिडॉर प्रकल्प निर्धारित वेळेत आणि उच्च दर्जासह पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या आहेत."- जयकुमार गोरे, पालकमंत्री, सोलापूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.