Pandharpur Pomegranate Price: पंढरपूर : डाळिंबाचे आगार असलेल्या सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उत्पादन घटले आहे. त्यामुळे बाजारातील आवक ही कमालीची मंदावली आहे. आवक कमी झाल्याने बाजारात डाळिंबाच्या दराने प्रति किलो दोनशेचा टप्पा पार केला आहे. मे ते नोव्हेंबर (२०२५) दरम्यान झालेली अतिवृष्टी आणि आणि भीमा सीनासह ओढ्यांना आलेल्या महापूरामुळे डाळिंबाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. परिणामी जिल्ह्यातील डाळींब उत्पादनात मोठी घट झाली आहे..पंढरपूर ही राज्यातील डाळिंबाची प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. येथील बाजारात महिनाभरापासून आवक कमी झाली आहे. दररोज फक्त ५० क्रेट पेक्षा कमी आवक होत आहे. एरवी दररोज ३ हजार पेक्षा अधिक क्रेट डाळिंबाची आवक व्हायची. आवक कमी झाल्याने येथील डाळिंब सौदे बाजारात शुकशुकाट आहे. डाळिंब व्यापारी देखील हतबल झाले आहेत. आणखी तीन ते चार महिने हीच स्थिती राहिली तर डाळिंबाचे भाव आणखी वाढतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे..Pomegranate Farming: डाळिंब उत्पादकांना दराने तारले.पंढरपूर, सांगोला, माढा या भागात मोठ्या प्रमाणावर डाळिंबाचे उत्पादन घेतले जाते. शिवाय डाळिंबाची निर्यात देखील याच भागातून होते. मागील वर्षी महापूर आणि सततच्या पावसामुळे डाळिंब बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले..Pomegranate Market: डाळिंब उत्पादकांना शेवटच्या टप्प्यात दराने तारले.जिल्ह्यात जवळपास पाच हजाराहून अधिक हेक्टर क्षेत्रावरील डाळिंब बागांना याचा फटका बसला. त्यातच करपा, तेल्या, मर यासारख्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे अनेक शेतकऱ्यांच्या बागा उध्वस्त झाल्या. परिणामी डाळिंबाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटले आहे. काही ठिकाणी डाळिंबाला नवा बहर येत आहे. काही शेतकऱ्यांनी जुन्या बागा जिवंत करण्याचा प्रयत्न केला आहे. तथापी बाजारात डाळिंबाची आवक वाढण्यासाठी आणखी किमान तीन ते चार महिने वाट पाहावी लागणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.