Environmental Issue: पंचगंगा नदीचे प्रदूषण करणाऱ्या इचलकरंजीतील प्रक्रिया (प्रोसेस) उद्योगांवर इचलकरंजी महापालिकेने ठोस कारवाई करून प्रदूषित पाणी नदीत सोडणे कायमस्वरूपी बंद करावे. मुठभर प्रक्रिया उद्योग चालकांच्या फायद्यासाठी इचलकरंजी शहरातील लाखो नागरिकांना वेठीस धरू नये, अशी मागणी ‘आंदोलन अंकुश’चे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी केली..शिरढोण (ता. शिरोळ) येथे आयोजित जागर सभेत ते बोलत होते. कुरुंदवाड येथे ३ जून रोजी होणाऱ्या ‘इचलकरंजी शहर पाणी बंद’ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या सभेचे आयोजन करण्यात आले होते..Panchganga River Pollution: पंचगंगेचे प्रदूषण रोखा, अन्यथा शुक्रवारी ‘पंचगंगा काठ’ बंद.श्री. चुडमुंगे म्हणाले, की गेल्या अनेक वर्षांपासून पंचगंगा नदीचे प्रदूषण होत असून त्याचा गंभीर परिणाम शिरोळ तालुक्यातील गावांवर होत आहे. नदीकाठच्या गावांमध्ये साथीचे आजार आणि कर्करोगग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली..Panchganga River Pollution: पंचगंगा प्रदूषणप्रश्नी शिरोळ तालुक्यात शुक्रवारी ११ गावात बंद.ते पुढे म्हणाले, की प्रदूषणामुळे शेती धोक्यात आली असून उत्पादनात घट होत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. प्रक्रिया उद्योग चालक नियमांचे उल्लंघन करून उद्योग चालवत आहेत. मात्र, इचलकरंजी महापालिका याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला..पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू असून, त्याला नदीकाठच्या गावांतून मोठा प्रतिसाद मिळत आहे. भावी पिढ्यांसाठी पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त होणे अत्यावश्यक आहे. त्यातून नदीकाठच्या गावांतील नागरिक, शेती आणि पशुधन सुरक्षित राहू शकेल. त्यामुळे ३ जून रोजी कुरुंदवाड येथे होणाऱ्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले..यावेळी राकेश जगदाळे, नागेश काळे, अविनाश पाटील, विश्वास बालिघाटे आणि अमोल गावडे यांनी मनोगत व्यक्त केले. सभेला विद्याधर मगदूम, रशीद मुल्ला, एकनाथ माने, प्रमोद नाईक, शिवाजी काळे, शाहीर बाणदार यांच्यासह ‘आंदोलन अंकुश’चे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.