Village Administration: पंचायत राज दिनाचा ग्रामपंचायतींना विसर पडला असून दक्षिण सोलापूर तालुक्यात ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले नाही. त्रीस्तरीय पंचायत राज व्यवस्थित ग्रामपंचायतीचे बळकटीकरण, सक्षमीकरण करण्यासाठी वेळोवेळी ग्रामसभा आयोजित केल्या जातात. .राष्ट्रीय पंचायत राज दिन २४ एप्रिल दिवशी साजरा झाला. केंद्रीय पंचायत राज मंत्रालयाकडून या दिवशी ग्रामसभा घेण्याचे परिपत्रक काढण्यात आले होते. मात्र, तालुक्यातील ८६ ग्रामपंचायत कार्यालयात काही अपवाद वगळता कुठेही पंचायत राज दिन साजरा करण्यात आला नाही किंवा ग्रामसभा घेण्यात आली नाही. .Vasundhara Day: वसुंधरा दिनानिमित्त आदिवासी बांधवांनी उभारले छोटे बंधारे.याबाबत विविध गावातील नागरिकांशी संपर्क साधला असता कुडल येथील अशोक सोनकटले यांनी सांगितले की २४ एप्रिल रोजी ग्रामपंचायत कार्यालय उघडण्यात आले नाही. कुंभारी येथील धीरज छपेकर यांनी सुध्दा ग्रामसभेबाबत काहीच कल्पना नसल्याचे सांगितले..Gram Panchayat Officer Awards: परभणीत आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कारांचे वितरण.तालुक्यातील काही ग्राम पंचायत अधिकाऱ्यांशी यासंदर्भात संपर्क केला असता त्यांनी सांगितले की आम्हाला पत्रक उशिरा मिळाले, वर्षभरात अनेक ग्रामसभाचे नियोजन करावे लागते. तर काही ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी आजची विशेष ग्रामसभा घेणे बंधनकारक नसल्याचे सांगितले..सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना ग्रामसभा घेण्याबाबत सूचना देण्यात आली होती. यापुढे प्रत्येकांना सूचना दिल्याची नोंद घेतली जाईल. पंचायत राज दिनानिमित्त ग्रामस्तरावर, तालुकास्तरावर, जिल्हास्तरावर विशेष कार्य करणाऱ्यांचा गौरव करणे, शाश्वत विकासासाठी चर्चा, स्व-उत्पन्नात वाढ करणे याबाबत ग्रामसभेत चर्चा होणे आवश्यक होते.- मनोज राऊत, गट विकास अधिकारी दक्षिण सोलापूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.