Sant Dnyaneshwar Maharaj Palakhi: श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, श्री स्वामी समर्थ ही महत्त्वाची देवस्थाने असलेल्या सोलापूर जिल्ह्यासाठी रस्ते मजबुतीचे महत्त्व मोठे आहे. या बाबी लक्षात घेऊन बांधण्यात आलेले हे महामार्ग प्रकल्प जिल्ह्यातील आध्यात्मिक स्थळांपर्यंत पोचण्यास भाविकांसाठी सुलभ झाले आहेत. श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पालखी घेऊन येणाऱ्या वारकरी भाविकांसाठी वेगळा रस्ता केला आहे. .यामुळे वारकरी भाविकांची वाट सुखकर झाल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी (ता. १४) केले. संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री गडकरी यांनी केली. या वेळी त्यांच्या समवेत पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार सर्वश्री सुभाष देशमुख, समाधान आवताडे, अभिजित पाटील, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर,.Pandharpur Corridor Project: पंढरपूर कॉरिडॉरला अखेर मंजुरी.माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, माजी आमदार राम सातपुते, जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस., पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, प्रांताधिकारी विजया पांगरकर, सचिन इथापे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रादेशिक अधिकारी अंशुमन श्रीवास्तव, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभिजित औटी तसेच अधिकारी, मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते..गडकरी म्हणाले, की तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट हे रस्ते यापूर्वी मोठ्या प्रमाणात खराब झाले होते. त्यामुळे वारकरी भाविकांना वाहतुकीच्या समस्येमुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. या मार्गावरील रस्ते करण्याची संधी मिळाली तर ते रस्ते चांगले कर अशी इच्छा माझ्या आईनी व्यक्त केली होती. पांडुरंगाच्या व आईच्या आशीर्वादाने मला रस्ते करण्याची संधी मिळाली. सध्या पालखी महामार्गाचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित कामे तत्काळ पूर्ण करण्यात येतील. पालखी महामार्गावरील काही ठिकाणची रखडलेली कामे डिसेंबरअखेर पूर्ण करण्यात येतील, असेही त्यांनी या वेळी सांगितले..Pandharpur Development: पंढरपूर विकास आराखड्याच्या कामास गती द्या .या वेळी माळशिरस तालुक्यातील घुले वस्ती येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेल्या पुरातन विहिरीचे जतन व संवर्धन करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून महामार्गात विशेष रचना करण्यात आली. तसेच पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगाव येथील बाजीराव विहिरीचे ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून जतन व संवर्धन करण्यात आले आहे. या विहिरींची पाहणी गडकरी यांनी केली. या वेळी त्यांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण देखील करण्यात आले..गडकरी यांचा बसने प्रवासपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करावा, महानगरात मेट्रोने प्रवास करावा या आवाहनाला प्रतिसाद देत मंत्री गडकरी यांनी बसने प्रवास करत संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी केली. तसेच आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्या निम्म्यावर आणण्याचे आदेश दिले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.