Palghar News: यंदा खरीप हंगामात पावसामुळे अगदी पेरणीपासून ते लागवडी, कापणीपर्यंत भातशेती वाया जाण्याच्या वाटेवर ठेपली आहे. एकंदरीत चांगला पाऊस झाल्याने उत्पादनही चांगले येण्याची अपेक्षा होती; मात्र सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाल्याने भातशेतीसह चिकू उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. .गेल्या आठवड्यातील संततधारेमुळे पालघर जिल्ह्यातील ३५० गावे बाधित झाली असून तीन हजार २६६ शेतकऱ्यांच्या अंदाजे ७०६ हेक्टर भातक्षेत्राचे नुकसान झाले आहे. सरकारने तातडीने पंचनामे करून योग्य न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी शेतकरीवर्गातून केली जात आहे. यंदा भातशेती चांगलीच बहरत आली होती. त्यामुळे उत्पादनही चांगले येईल, अशी बळीराजाला अपेक्षा होती; परंतु अतिवृष्टीमुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाण्याच्या प्रवाहासोबत भातशेती खणून मुळासकट उपटली गेली आहे..Crop Loss Maharashtra : शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त, पण सरकारला पाझर फुटेना.भातशेतीची अक्षरशः दुर्दशा झाली आहे. पावसामुळे शेतकऱ्यांच्या उरल्यासुरल्या आशांवर पाणी फेरले आहे. कापणीसाठी तयार असलेल्या भाताचे दाणे भिजल्यामुळे त्याला अंकुर आले आहेत. त्यामुळे पीक पूर्णपणे वाया गेले आहे. या आपत्तीने शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले आहे. प्रशासनाने तातडीने पावले उचलून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे..दाणेही गळून पाण्यातहळवे भातपीक कापणीला आले होते. साधारणत: दसऱ्याच्या मुहूर्तावर भातपीक कापणीचा शेतकऱ्यांचे नियोजन होते; परंतु अतिवृष्टीमुळे कापणीस तयार झालेली भातशेती आडवी झाली आहे. त्यामुळे तयार झालेले दाणेही भात खाचरात गळून पडण्याची शक्यता आहे. त्याचा विपरीत परिणाम उत्पादनावर होणार आहे. यामुळे शेतकरी भरपाईची मागणी करत आहेत. .Rain Crop Loss : ‘साहेब, चांगलं पीक आलं, पण पावसानं सगळं नेलं.प्रत्येकी हजारोंचा खर्च वायाअनेक शेतांमध्ये गेल्या चार दिवसांपासून पाणी साचले आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचे भात हे उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असल्याने अनेकांनी हजारोंचे बियाणे, महागडी खते, औषधे खरेदी करून लागवड केली होती; मात्र पावसाने भातपिके आडवी झाली असून भाताच्या दाण्याला मोड आले आहेत..भातपीक नुकसानीचा प्राथमिक अंदाजतालुका बाधित गावे बाधित क्षेत्र (हे.) नुकसानग्रस्त शेतकरीपालघर १०६ १११ ९६८डहाणू ५८ ६८.३५ १७८तलासरी २८ ३२ ११२.Crop Loss Inspection: मराठवाड्यात ७५.९६ टक्के पंचनामे आटोपले.वाडा ८९ ३१२ ८८७विक्रमगड ०९ १० ५०जव्हार ०६ १८.४० ४२मोखाडा ५४ १५३.७० १,०२९एकूण ३५० ७०५.७५ ३,२६६.क्षेत्रीय पातळीवर पंचनामे तातडीने सुरू करण्यात आले आहेत. प्राथमिक अहवालानुसार अंदाजे ७०५.७५ हेक्टरचे नुकसान झाले आहे.- नीलेश भागेश्वर, कृषी अधीक्षक.वाऱ्यामुळे भाजीपाला पिकांसह चिकू फळेही गळून पडली. चिकू उत्पादन मिळणे कठीण होणार आहे. पुढील हंगामही वाया जाण्याची शक्यता आहे. - मनोज कारूळकर, चिकू उत्पादक.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.