Vangaon News: पालघर जिल्ह्यात गवत पावळी खरेदी व विक्रीच्या माध्यमातून कोट्यवधींची उलाढाल होते, परंतु यंदा पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. भातशेतीबरोबरच पावळीही खराब झाल्याने व्यापारीवर्गावरही अस्मानी संकट कोसळले आहे. .गेल्या वर्षीच्या तुलनेत मागील चार ते पाच वर्षांत पावळीचे दर कमी होते. साधारणतः ५०० किलोच्या पावळीला १५०० ते १६०० रुपये मिळत होते, परंतु गेल्या वर्षी पावळीच्या दरात समाधानकारक वाढ होती. गेल्या वर्षी एका काट्याला म्हणजेच ५०० किलो वजनाच्या पावळीला सुमारे २००० ते २२०० रुपये मिळत होते, परंतु भातशेतीवरून पूर गेल्याने पावळीची प्रतही खालावली आहे. .Farmer Crisis: आपत्तीतून उभारी घेऊ; भोसले कुटुंबाचा निर्धार .दरही अजून निश्चित नाहीत!दरवर्षी दसरा ते दिवाळीच्या आधी भातशेती कापणीची कामे पूर्ण होतात. त्यामुळे दरही त्याच काळात निश्चित होतात, परंतु पावसाचे थैमान सुरूच असल्याने भातशेतीची कामे पूर्ण झालेली नाहीत. यामुळे अजूनही दर निश्चित झालेले नाहीत, असे पावळी खरेदी व्यापारी सांगतात..Farmer Crisis: शेतकऱ्याला संकट आलं म्हणून थांबून कसं चालंल...! .परराज्यांतून मोठी मागणीपावळीला परराज्यातही मोठी मागणी असते. गुजरातमध्ये दुभत्या जनावरांसाठी वैरण आणि सुखा चारा यासाठी मोठ्या प्रमाणात व्यापारी पावळीची खरेदी करतात. काश्मीरमध्ये सैनिकी तंबूसाठी पावळीचा वापर केला जातो..गेल्या वर्षी पावळीचे उत्पादन आणि भावही चांगला मिळाला होता, परंतु यंदा मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने पावळीची प्रत खालावली आहे. पावळी अक्षरश: काळी पडली आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांसह पावळी खरेदी-विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवरही मोठे संकट कोसळले आहे.- शिवराम विघ्ने, व्यापारी, विक्रमगड.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.