Palghar News: पालघर जिल्ह्यात केंद्र व राज्य शासनाच्या जलसंधारणाशी संबंधित विविध महत्त्वाकांक्षी योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय आढावा बैठक पार पडली. शासनाच्या सकारात्मक धोरणामुळे जिल्ह्यातील जलसंधारण योजनांना गती मिळणार असून त्याचा थेट लाभ शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिकांना होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. जाखड यांनी व्यक्त केला..जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, उपजिल्हाधिकारी रणजित देसाई, उपजिल्हाधिकारी विजया जाधव, तसेच जलसंधारण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. .Water Conservation: लोकसहभागातून उभारले जलसंधारणाचे मॉडेल.बैठकीत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, जलयुक्त शिवार अभियान, लघुसिंचन योजनांची सातवी प्रगणना, जलसाठ्याची प्रगणना, प्रत्यक्ष स्थळपडताळणी, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार, नाला खोलीकरण व रुंदीकरण, तसेच जलशक्ती अभियान ‘कॅच द रेन’ अंतर्गत ‘जल संचय, जन भागीदारी’ या योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. .Water Conservation: मोखाड्यात जलसमृद्धीचा ध्यास.बैठकीत सदस्य सचिव तथा जिल्हा जलसंधारण अधिकारी फरीद खान यांनी योजनानिहाय प्रगतीचा सादरीकरणाद्वारे आढावा दिला. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत मृद व जलसंधारण विभाग, जिल्हा परिषद, वन विभाग व कृषी विभागामार्फत एकूण १३५२ कामे पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली. या प्रगतीबाबत समाधान व्यक्त करत जिल्हाधिकारी डॉ. जाखड यांनी निर्देश दिले..‘जलयुक्त’ची २,२६० कामे पूर्णजलयुक्त शिवार योजनेअंतर्गत इतर योजनांतून १४७१ तर विशेष निधीतून ७८९ अशी एकूण २२६० कामे पूर्ण झाली आहेत. कामांची गुणवत्ता राखून नियोजनबद्ध पद्धतीने वेळेत पूर्तता करण्यावर भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच लघुसिंचन योजनांची सातवी प्रगणना व जलसाठा प्रगणना अंतर्गत १००९ गावांमध्ये काम सुरू असून, प्रत्यक्ष स्थळपडताळणी योजनेंतर्गत २८, ५३९ कामांपैकी ११, २११ कामांचे मॅपिंग पूर्ण झाले आहे. तसेच गाळमुक्त धरण योजनेंतर्गत १६, ५२० घनमीटर गाळ काढला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.