Nashik News: नाशिक जिल्ह्यातून पालखेड डाव्या कालव्याच्या पाटबंधारे व्यवस्थेला तब्बल ५० वर्षांनी नवसंजीवनी मिळणार आहे. केंद्रीय जल आयोग व आशियाई विकास बँक (एडीबी) यांच्या संयुक्त विद्यमाने नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत ‘इरीगेशन मॉडर्नायझेशन प्लॅन’ संदर्भात पालखेड पाटबंधारे विभागामार्फत सादरीकरण होऊन सकारात्मक चर्चा पार पडली..राज्य शासनास सादर करण्यात आलेल्या १२८३ कोटी रुपयांच्या प्राथमिक प्रकल्प अहवालानुसार, कालव्याचे १२८ किलोमीटर लांबीतील गळती असलेले भाग काँक्रिट अस्तरीकरणाद्वारे दुरुस्त करण्यात येणार आहेत..Nashik Irrigation : शेतकरी, पाणीवापर संस्थांनी २८ जुलैपर्यंत अर्ज सादर करावेत.याशिवाय, कालव्यावरील ५२ वितरिकांचे पूर्ण लांबीतील पाइपलाइन रूपांतरण, कालव्यालगत रस्ते बांधकाम तसेच पाणी वापर संस्थांसाठी अत्याधुनिक स्काडा ऑटोमेशन प्रणालीद्वारे पाणी मोजमाप यंत्रणा उभारण्यात येणार आहे. या कामांमुळे कालवा वहन खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होऊन अतिरिक्त क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे..या प्रकल्पाला महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा, नियोजन व वित्त विभागांची तत्त्वतः मान्यता मिळाली असून मुख्यमंत्री कार्यालयाकडे प्रस्ताव पुढील टप्प्यासाठी पाठवण्यात आला आहे.केंद्र सरकारच्या आर्थिक व्यवहार विभागाची मान्यता मिळाल्यानंतर सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जाणार असून अंतिम मान्यता मिळताच या कामाला गती मिळेल..Nashik Heavy Rain : पश्चिम पट्ट्यात घाटमाथ्यावर पावसाचा जोर.योजनेनुसार आशियाई विकास बँक ७० टक्के निधी तर राज्य शासन ३० टक्के निधी उपलब्ध करून देणार आहे. यासाठी कालव्याच्या संपूर्ण लाभक्षेत्राचे व वितरिकांचे सर्वेक्षण करून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी ३१.२० कोटींची तरतूद प्राथमिक अहवालात करण्यात आली आहे..या प्रकल्पासंदर्भात १७ सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या आढावा बैठकीस केंद्रीय जल आयोगाचे संचालक व मुख्य अभियंता आशिष बॅनर्जी, संचालक व मुख्य अभियंता पद्म दोरजे तसेच सीडब्ल्यूसीचे उपसंचालक व इतर अधिकारी उपस्थित होते..पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिकचे कार्यकारी अभियंता वैभव भागवत, उपअभियंता प्रशांत गोवर्धन, प्रवीण पवार व शाखा अभियंता संदीप माळी यांनी या बैठकीत विभागीय सादरीकरण केले. ५० वर्षांनंतर पालखेड डाव्या कालव्याला मिळणारी ही नवसंजीवनी प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी जीवनदायी ठरणार असून भविष्यात सिंचनाच्या दृष्टीने नाशिक जिल्ह्यात मोठा बदल घडवेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.