New Delhi News: यंदा शेती क्षेत्रातील आठ तज्ज्ञांना पद्म पुरस्कार जाहीर झाला. यात भारतीय कृषी संशोधन संस्थेचे माजी संचालक डॉ. अशोक कुमार सिंह यांचा समावेश आहे. शेती विज्ञानातील योगदानाबद्दल एप्रिलमध्ये राष्ट्रपती भवन येथे होणाऱ्या कार्यक्रमात त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. त्यांनी बासमतीचे नवीन वाण विकसित करण्यात आणि संकरित भाताच्या संशोधनात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. .डॉ. सिंह सुमारे तीन दशके नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेत (आयसीएआर) कार्यरत राहिले. त्यांनी या कालावधीत तब्बल २५ सुधारित बासमती भात वाण विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सध्या या वाणांची भारतात सुमारे २० लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जाते..Ashok Kumar Singh Padma Shri: बासमतीला दिला अनोखा सुगंध, शेतकऱ्यांचं उत्पन्नही वाढलं, कोण आहेत अशोक कुमार सिंह?, ज्यांचा 'पद्मश्री'नं सन्मान.या बासमती वाणांमुळे उत्पादनक्षमता वाढली आहे. तसेच भात गुणवत्ता सुधारली असून, रोगप्रतिरोधकता वाढली आहे. याचा फायदा उत्तर भारतातील लाखो बासमती भात उत्पादक शेतकऱ्यांना झाला. त्यांच्या संशोधनामुळे भारताचे जागतिक बासमती बाजारपेठेत स्थान मजबूत झाले आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांचे उत्पन्न स्थिर आणि लाभदायक उत्पन्न सुनिश्चित होण्यास मदत झाली..Padma Shri Award: शेतीतज्ज्ञ दादा लाड, कलावंत रघुवीर खेडकर यांना पद्मश्री.त्यांनी १९९४ ते २००९ दरम्यानच्या कालावधीत हिसारमधील बायोसीड जेनेटिक्समध्ये कापसाचे सुधारित वाण विकसित करण्यासाठी काम केले. २००९ मध्ये ते ‘आयसीएआर’मध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ बनले. त्यांनी तिथे प्राध्यापक म्हणून काम केले आणि त्यानंतर ते विभागप्रमुख झाले. एकूणच शेती संशोधनातील त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. त्यांना यापूर्वी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यात २००३ चा ‘आयसीएआर’चा सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार आणि २०१२ मधील डॉ. बीपी पाल- बोरलॉग पुरस्कारांचा समावेश आहे..‘पुसा बासमती’चे जनक’‘पुसा बासमती १६३७’ हे वाण विकसित करण्याचे त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. हे सुधारित भाताचे वाण लोह आणि झिंकने समृद्ध असल्याने उत्पादनासह पोषणही वाढण्यास मदत झाली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.