Ahilyanagar News: रामनगर (उत्तराखंड) येथे आखिल भारतीय अखंड राजपूताना राष्ट्रीय सेवा संघतर्फे आयोजित राष्ट्रीय बिझनेस समिट व सन्मान सोहळा पार पडला. यावेळी पद्मश्री पोपटराव पवार यांना ‘आज का कर्मवीर’ पुरस्काराने गौरविण्यात आले..रामनगर (उत्तराखंड) येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्याला अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह, बिहारचे पर्यटन मंत्री डॉ. राजेशकुमार सिंह, महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल, शौर्य शिरोमणी महाराणा प्रताप यांचे वंशज महाराणा डॉ. लक्षराज सिंह मेवाड.Popatrao Pawar: सरकारच्या ग्राम सामाजिक परिवर्तन प्रतिष्ठान प्रकल्पाचं काय झालं?.कर्मवीर पुरस्कार फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. आर.पी. सिंह ,महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोशियारी आदी उपस्थित होते. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी, माजी मुख्यमंत्री तथा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच राजपूत क्षेत्रातील क्षत्रियांनी महानुभवांनी यासाठी विशेष संदेश दिले होते..Popatrao Pawar : एकोप्यातूनही आदर्श गावाची उभारणी : पोपटराव पवार.छत्रपती शिवाजी महाराज व महाराणा प्रताप यांच्या प्रेरणेतून या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली आहे. कार्यक्रमाची सुरुवातही महाराजांचा जयघोष करून करण्यात आली..दर वर्षी भारतातील एका राज्यात औद्योगिक परिषदेचे आयोजन करून राजकीय, प्रशासकीय, सामाजीक, औद्योगिक क्षेत्रात राष्ट्र उभारणीसाठी योगदान देणाऱ्या विशेष व्यक्तींना हा सन्मान दिला जातो. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.