Agricultural Labor Shortage : मुसळधार पावसामुळे मुरबाड तालुक्यातील भातशेतीला मोठा फटका बसला आहे. पेरणीनंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी भाताची रोपे तीन दिवसांपर्यंत पुराच्या पाण्याखाली राहिल्याने कुजली आहेत. त्यामुळे लावणीसाठी रोपांची कमतरता निर्माण झाली आहे. पावसाचा जोर ओसरल्यानंतर उपलब्ध रोपांच्या आधारे लावणीची कामे वेगाने सुरू झाली आहेत..मुरबाड तालुक्यात भात हे प्रमुख पीक असून सध्या बहुतांश शेतकरी कुटुंबासह लावणीच्या कामात व्यग्र आहेत. मात्र, रोपांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने अनेकांना मर्यादित रोपांवरच लागवड करावी लागत आहे. त्यामुळे यंदा भात उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे..Monsoon Delay: मॉन्सूनच्या विलंबाने खरीप हंगामाला फटका.यंदाच्या हंगामात मजुरांची टंचाई हेही मोठे संकट ठरले आहे. अनेक शेतकरी कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने लावणी करत असले, तरी मजूर मिळणे कठीण झाले आहे. परिणामी, एका मजुरासाठी दिवसाला ४०० ते ६०० रुपये इतकी मजुरी मोजावी लागत आहे. त्यामुळे शेतीचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे..Cotton Re-Cultivation: पावसाने दगा दिला, कपाशी करपली; दुबार पेरणीचे संकट.पूर्वी वाडा आणि डहाणू परिसरातून मोठ्या प्रमाणात लावणीसाठी मजूर येत असत. मात्र, रोजगाराच्या बदलत्या संधींमुळे बाहेरगावच्या मजुरांची संख्या घटल्याने मुरबाड तालुक्यात मजुरांची टंचाई तीव्र झाली आहे. त्याचा थेट परिणाम मजुरीच्या दरावर झाला आहे. अतिवृष्टी, मजुरांची कमतरता आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे यंदा भात शेती परवडेनाशी झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे योग्य हमीभाव सरकारने जाहीर करावा, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे..अतिरिक्त खर्चात वाढभातबियाणे, खते, औषधे, मशागतीचा खर्च आधीच वाढलेला असताना अतिवृष्टीमुळे रोपांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना दुहेरी आर्थिक फटका बसला आहे. बैलजोडींची संख्या कमी झाल्याने ट्रॅक्टर व पॉवर टिलरवर अवलंबून राहावे लागत असून, त्यासाठीही अतिरिक्त खर्च करावा लागत आहे..शेतकऱ्यांपुढील प्रमुख अडचणीअतिवृष्टीमुळे भात रोपांचे नुकसानलावणीसाठी मजुरांची तीव्र टंचाईमजुरीचा दर ४०० ते ६०० रुपये प्रतिदिनबियाणे, औषधे, खते, मशागतीचा वाढलेला खर्चभाताला योग्य हमीभाव देण्याची मागणी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.