Paddy Belt Abuzz : खरीप हंगामात भात लागवडीच्या कामांना वेग आला असून पारंपरिक पद्धतीसोबत सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यावर भर दिला जात आहे. याच पार्श्वभूमीवर मौजा कन्हाळगाव येथे शेतकरी खुशाल परसे यांच्या शेतात जिल्हा कृषी अधीक्षक प्रीती हिरडकर यांनी प्रत्यक्ष भात खाचरात उतरून गावातील महिलांसमवेत श्री पद्धत व पट्टा पद्धतीने भात रोवणीचे प्रात्यक्षिक करून दाखविले..यावेळी कमी बियाण्यात अधिक उत्पादन, रोपांतील योग्य अंतर, पाण्याचा कार्यक्षम वापर तसेच पिकांची जोमदार वाढ यासाठी सुधारित लागवड पद्धतींचा अवलंब करण्याचे महत्त्व शेतकऱ्यांना सांगण्यात आले. महिलांनीही प्रत्यक्ष रोवणीमध्ये सहभाग घेतल्याने या तंत्रज्ञानाची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली. .Paddy Sowing: सिंधुदुर्गात भातरोप पुनर्लागवडीला प्रारंभ.त्यानंतर रांगी येथे शेतकरी महेंद्र भगवान शहा काटेंगे यांच्या शेतातील डीएसआर (डायरेक्ट सीडेड राईस) पद्धतीने करण्यात आलेल्या भात लागवडीची पाहणी करण्यात आली. या पद्धतीमुळे मजुरीची बचत, वेळेवर लागवड आणि पाण्याचा कमी वापर होऊन उत्पादन खर्चात घट करण्यास मदत होत असल्याची माहिती देण्यात आली..Paddy Transplanting Practical: त्र्यंबकेश्वर तालुक्यात यांत्रिक भात लागवड प्रात्यक्षिके.मोहली येथे बचत गटांनी तयार केलेल्या दशपर्णी अर्काची पाहणी करून नैसर्गिक शेतीमध्ये स्थानिक उपलब्ध संसाधनांपासून तयार होणाऱ्या जैविक निविष्ठांचा वापर वाढविण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. रासायनिक निविष्ठांवरील अवलंबित्व कमी करून शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे यावेळी सांगण्यात आले..या पाहणी व मार्गदर्शन दौऱ्यावेळी तालुका कृषी अधिकारी सरोगडे, प्रभारी मंडळ कृषी अधिकारी चलाख, उपकृषी अधिकारी मोहुरले, सहायक कृषी अधिकारी आर. एन. मेश्राम तसेच परिसरातील शेतकरी उपस्थित होते.