Paddy Procurement: उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने २०२५-२६ च्या हंगामातील भात आणि बाजरी खरेदीची सुमारे २,१३१ कोटी रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचे पैसे ४८ तासांच्या आत दिले जात आहेत. कोणत्याही मध्यस्थाविना किमान आधारभूत किमतीत खरेदी आणि पारदर्शक व्यवस्थेचा राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांना फायदा होत असल्याचे राज्य सरकारचे म्हणणे आहे. .भात खरेदी केंद्रावर येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याकडून भाताची खरेदी करावी आणि वेळेवर त्यांच्या खात्यात थेट पैसे जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी भात खरेदीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी सांगितले की, भात खरेदीची गती वाढवावी आणि शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये, याची काळजी घ्यावी..Paddy Harvesting: भात कापणीसाठी यांत्रिकीकरणाकडे कल.तसेच शेतकऱ्यांच्या सोयीसाठी राज्य सरकारने भात खरेदी केंद्रांची संख्या पाच हजारांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेश सरकारने २०२५-२६ च्या खरेदी हंगामात शेतकऱ्यांच्या शेतमालास हमीभाव मिळवून देण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. राज्य सरकारने ३० नोव्हेंबरपर्यंत सुमारे दीड लाख शेतकऱ्यांकडून ९.०२ लाख मेट्रिक टन भाताची खरेदी केली आहे. तर भात खरेदीचे शेतकऱ्यांना १,९८४ कोटी रुपये खात्यात जमा केले आहेत. विशेष म्हणजे शेतमालाच्या विक्रीनंतर ४८ तासांच्या आत पैसे शेतकऱ्यांना दिले जात आहेत..Paddy Production: जावळीत यंदा भाताच्या उत्पन्नात ५० टक्के घट.सध्या राज्यातील ४,२२७ केंद्रावर शेतमालाची खरेदी केली जात आहे. आता खरेदी केंद्रांची संख्या ५ हजार करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रावरील गर्दी कमी करणे आणि शेतकऱ्यांचा वेळ वाचावा यासाठी कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याचे निर्देश दिले आहेत. .सर्वसाधारण भातासाठी प्रतिक्विंटल २,३६९ रुपये, ग्रेड ए भातासाठी २,३८९ रुपये आणि बाजरीसाठी प्रतिक्विंटल २,७७५ रुपये किमान आधारभूत किंमत निश्चित केली आहे..सरकारने १७ टक्क्यांपर्यंत ओलावा असलेल्या भाताच्या खरेदीला परवानगी दिली आहे. यामुळे अधिक शेतकऱ्यांना तोटा न होता शेतमालाची विक्री करता येत आहे. .१ ऑक्टोबर ते २८ नोव्हेंबर दरम्यानच्या कालावधीतील बाजरी खरेदीचे जवळपास २२ हजार शेतकऱ्यांना २६३.०३ कोटी रुपये देण्यात आले आहेत. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.