Paddy Farming Crisis: पुणे जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात १ ते ८ जुलैदरम्यान झालेल्या अतिमुसळधार पावसाचा भात रोपवाटिकांना मोठा फटका बसला आहे. अतिवृष्टी आणि पुराच्या पाण्यामुळे जिल्ह्यातील ३०२ गावांमधील सुमारे चार हजार शेतकऱ्यांच्या भात रोपवाटिकांचे नुकसान झाले असून एकूण ३०५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. कृषी विभागाच्या नजरअंदाज पाहणी अहवालातून ही माहिती समोर आली आहे..पश्चिम भागातील तालुक्यांमध्ये या कालावधीत पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढला होता. अतिवृष्टीमुळे नदी, नाले आणि ओढ्यांच्या पाण्याचा प्रवाह बदलला. अनेक ठिकाणी पुराचे पाणी शेतांमध्ये शिरल्याने भाताच्या रोपवाटिकांचे नुकसान झाले. काही भागांत रोपवाटिकांमधील माती आणि रोपे वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे..Heavy Rain Crop Damage: अतिवृष्टीने ६६४ हेक्टर शेतीचे नुकसान.पावसाच्या पाण्याबरोबर माती वाहून गेल्याने अनेक ठिकाणी शेतजमिनीचा सुपीक थर नष्ट झाला आहे. काही शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर भगदाडे पडली असून, पिकांच्या क्षेत्राचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे आगामी हंगामातील उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नुकसान झालेल्या शेतजमिनी पुन्हा लागवडीखाली आणण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागणार आहे..Heavy Rainfalll Damage: नांदुरा तालुक्यात मुसळधार पावसाचा तडाखा; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या अखत्यारितील अधिकाऱ्यांनी केलेल्या नजरअंदाज पाहणीतून नुकसानाची ही प्राथमिक माहिती समोर आली आहे..खेड, भोर, आंबेगाव, मुळशी, मावळ, जुन्नर, हवेली आणि वेल्हा या आठ तालुक्यांतील ३०२ गावांमध्ये भात रोपवाटिकांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाने संकलित केलेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या निकषांनुसार मदत मिळवून देण्यासाठी कृषी विभागाकडून पुढील कार्यवाही केली जाणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.