Raigad News : दोन दिवस सतत पडणाऱ्या पावसाने भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. सप्टेंबर अखेरीसही पावसाचा जोर कायम असल्याने भाताचे कोठार असा लौकिक असलेल्या जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल आहे.भाताची रोपे अक्षरशः कोलमडून पडली असून, पिके पाण्याखाली गेली आहेत. सततच्या पावसाने झालेले नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न सुरू असताना पुन्हा आलेल्या पावसाने शेतकरी हवालदिल झाला आहे. .कर्जत तालुक्यातील भातशेती ही फक्त उत्पन्नाचे साधन नसून घरगुती धान्य आणि शेतीची परंपरा जपण्यासाठी घेतली जाते, मात्र हेक्टरी लागणारा खर्च आणि मिळणारे उत्पादनाचा ताळमेळ नसताना नैसर्गिक आपत्तीने सर्व गणित कोलमडून टाकले आहे..Paddy Crop Damage : कालव्याच्या पाण्यामुळे खांबमध्ये भातशेतीचे नुकसान .शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, कर्जफेड करणे कठीण झाले आहे. पिके नष्ट झाल्यामुळे उत्पन्नाचे स्रोत बंद झाले आहेत. त्यामुळे शासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी खालापूर येथील वरद विनायक शेतकरी कृषी सामाजिक संस्थेने केली आहे. मात्र पंचनाम्यानंतर प्रत्यक्ष मदत शेतकऱ्यांच्या हातात कधी येईल, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे..उपजीविकेचा प्रश्नकर्जत तालुक्यातील परिस्थिती अतिशय गंभीर असून, शासनाने आर्थिक मदत, कर्जमाफी, आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी उपाययोजना तातडीने राबविण्याची गरज आहे. ओला दुष्काळ जाहीर करून मदतीची प्रक्रिया गतिमान करावी, अशी मागणी होत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी तातडीने कार्यवाही झाली नाही, तर आगामी काळात उपजीविकेवर संकट ओढवण्याची परिस्थिती आहे..नदीकाठच्या शेतीला फटकासंततधारेचा सर्वाधिक फटका नदीकाठच्या शेतीला बसला. पाताळगंगा, कुंडलिका, काळ, सावित्री नद्यांच्या लगतच्या सखल भागात पाण्याची पातळी वाढत आहे. एका बाजूला पावसाचे पाणी, दुसऱ्या बाजूने उधाणामुळे किनारपट्टीलगतची खलाटी भरुन गेली आहे..Paddy Crop Damage: परिपक्व झालेले भातपीक नुकसानीच्या उबंरठ्यावर.उत्पन्नावर पाणीरायगड जिल्हा भाताचा कोठार म्हणून ओळखला जातो. गेल्या काही वर्षातील औद्योगिकीकरणामुळे शेत-जमिनींची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. काही ठिकाणी शिल्लक राहिलेली शेती प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. या परिस्थितीत कर्जत, खालापुरातील शेतकरी विविध जातीच्या भाताची लागवड करतात. खालापूर तालुक्यात २,७५० हेक्टर क्षेत्रावर यंदा भातलागवड झाली आहे. मजुरांची कमतरता, वाढलेल्या मजुरीमुळे मिळाणारे जेमतेम उत्पन्न मिळते. सप्टेंबर अखेरीस भातपीक जोमाने आले असून, लोंबी तयार झाल्या आहेत, पण अतिवृष्टीमुळे पीक हातातून जाण्याची शक्यता आहे..दोन दिवसांत ३४ मिमीशुक्रवार सायंकाळपासून सुरु झालेल्या पावसाची सर्वाधिक सरासरी म्हसळा, माणगाव, महाड, पोलादपुर या तालुक्यांमध्ये आहे. दोन दिवसात सरासरी ४३ मिमी पाऊस पडला. माथेरानमध्येही पावसाची सरासरी २५ मिमी इतकी नोंदवली गेली. सतत पडणाऱ्या या पावसाने सुर्यदर्शन झालेलेच नाही. सततचा पाऊस, दमट हवा यामुळे वातावरणात चांगलाच गारवा आला आहे..भातपीक तयार होत असल्याने पावसाचे प्रमाण कमी होणे गरजेचे होते. सतत पडत असलेल्या पावसाने पिकाचे नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे. प्राथमिक अंदाजानुसार किती हेक्टरमध्ये नुकसान झालेले आहे, हे सांगता येणे कठीण आहे.- वंदना शिंदे, जिल्हा कृषी अधीक्षक.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.