Paddy Farming: नवेगावबांध परिसरात उन्हाळी भात पिकावर करपा (बुरशीजन्य) रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. मार्च महिन्यात अचानक वाढलेल्या तापमानामुळे ही परिस्थिती उद्भविल्याचे सांगितले जाते. .खरीप हंगामात धानाला योग्य दर न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून उन्हाळी भाताची लागवड केली होती. मात्र तापमानात अचानक झालेली वाढ आणि वातावरणातील बदल यामुळे करपा रोग वेगाने पसरत आहे. परिणामी, पिकांची पाने पिवळी पडून करपत असून, उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे..Paddy Disease : विक्रमगडमध्ये भातपिकावर करपा रोग.दरम्यान, कृषी विभागाकडून अपेक्षित मार्गदर्शन वेळेवर मिळत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. कृषी विभागाच्या अनास्थेमुळे स्थिती हाताबाहेर जात असून अनेक शेतकरी खासगी कृषी केंद्रांच्या सल्ल्यानुसार महागडी कीटकनाशके वापरत असून, त्यामुळे खर्चात मोठी वाढ होत असल्याचे सांगण्यात आले..सावरटोला परिसरातील प्रगतिशील शेतकऱ्यांनी सांगितले, की रासायनिक खतांचा अतिरेक व जमिनीतील जैवविविधता घटल्यामुळे पिकांची रोगप्रतिकारक क्षमता कमी झाली आहे. वाढते तापमान आणि बुरशीजन्य रोग यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. .Paddy Crop Loss: सततच्या पावसाने भात पिकाचे नुकसान.या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने तातडीने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करावे, योग्य बुरशीनाशके फवारणीचे नियोजन करावे व नुकसान टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.....अशी आहे स्थितीप्रभावित क्षेत्र : अंदाजे ३० ते ४० टक्के भात क्षेत्रउत्पादन घट संभाव्यता : २० ते २५ टक्क्यांपर्यंतवाढलेला अतिरिक्त खर्च : कीटकनाशके फवारणीमुळे प्रति एकर २ ते ३ हजार रुपये.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.