पाणी जीवन आहे, हे खरेच! ते सर्व सजीवांसाठी संजीवनीही आहे, पण केव्हा? त्या पाण्यात ऑक्सिजन मिसळलेला असेल तरच! पाणी म्हणजे शास्त्रीय भाषेत H२O. पाण्याचा एक रेणू म्हणजेच हायड्रोजनचे दोन अणू आणि ऑक्सिजनचा एक अणू बंधाने बांधलेले असणे होय. पाण्याच्या अशा दोन रेणूंमध्ये जेव्हा अधिकचा ऑक्सिजन अणू जाऊन बसतो, त्या वेळी तो असतो पाण्यामध्ये विरघळलेला जादा ऑक्सिजन. पाण्यात ऑक्सिजन मिसळलेला असल्यास त्या पाण्यामध्ये सजीव जगू शकतात. जर पाण्यामध्ये विरघलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण शून्य असेल, तर ते पाणी मृत आहे असे म्हटले जाते. प्रति लिटर पाण्यात ५ मिलिग्रॅम ऑक्सिजन असल्यास त्यात सजीव जगू शकतात. पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनवर जलचर जगतात. .८ ते १० मिलिग्रॅम प्रति लिटर इतकी ऑक्सिजनची मात्रा असलेले पाणी हे एक सुदृढ जल परिसंस्था असते. अशा पाण्यात जलचर प्राणी व वनस्पती यांची वाढ चांगली होते. त्यांचे पुनरुत्पादनही उत्तम होते. नैसर्गिकरीत्या पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनची मात्रा १२ ते १३ मिलिग्रॅम प्रति लिटर इथपर्यंतच असते. पण पाण्यात कृत्रिमरीत्या ऑक्सिजन मिसळता येतो. तांत्रिक पद्धती उदा. एरिएशन, ऑक्सिजन इन्फ्युजनद्वारे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण ४० ते ६० मिलिग्रॅम प्रति लिटरपर्यंत वाढविणे शक्य आहे.त्याचे जास्तीत जास्त प्रमाण एक लाख मिलिग्रॅम प्रति लिटर इथपर्यंत जाऊ शकते. याला ‘ऑक्सिजनेटेड वॉटर’ ‘प्राणवायूयुक्त पाणी’ अशी संज्ञा आहे. असे पाणी कृत्रिमरीत्या सहज आणि स्वस्तामध्ये तयार करणे शक्य आहे. त्यासाठी गेल्या काही वर्षांमध्ये उत्तम संशोधन झालेले आहे.....असा मिसळता येतो पाण्यामध्ये जास्तीचा ऑक्सिजनउंचावरून पाणी सोडणे. त्यामुळे हवेतील ऑक्सिजन त्यामध्ये विरघळतो.दगडावर पाणी आदळून तुषार निर्मिती केल्यास त्यात वातावरणातील ऑक्सिजन जास्त विरघळतो. डोंगरात झऱ्यांचे फेसाळत वाहणारे पाणी त्यात विरघळलेल्या अधिक ऑक्सिजनमुळेच चवीला छान लागते. असे पाणी प्यायल्यानंतर ताजेतवाने वाटते.पाणी सतत ढवळत राहिल्यास त्यात हवेतील प्राणवायू मिसळण्याची शक्यता वाढते.रून केलेले ‘एरिएशन’. यामुळे पाण्यात प्राणवायू मिसळण्यास अनुकूल परिस्थिती तयार होते.पाण्यात अतिसंपृप्त ऑक्सिजनच्या द्रावणाचे थेंब आवश्यक तेवढ्या प्रमाणात मिसळणे, ही प्रक्रियाही पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण वाढविण्यासाठी केली जाते.जसजसे पाण्याचे तपमान वाढत जाते, तसतसे त्यात ऑक्सिजन विरघळण्याची क्षमता कमी होत जाते. पाणीसाठ्यामध्ये असलेल्या पाण्यात सर्वसाधारणपणे सूर्योदयापूर्वी प्राणवायूचे प्रमाण कमी असते. सूर्योदयानंतर पाण्यात पडलेल्या प्रकाशामध्ये पाण्यातील वनस्पती आणि हरित प्लवके प्रकाश संश्लेषणातून अन्नाची निर्मिती करतात. या प्रक्रियेमध्ये कार्बन डायऑक्साईड वापरला जातो, तर ऑक्सिजन तयार होतो. हा तयार झालेला ऑक्सिजन पाण्यात मिसळत जातो. यामुळेच दुपारी पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण २४ तासात सर्वाधिक असल्याचे निरीक्षण आहे..ऑक्सिजनेटेड पाण्याचे मानसावरील परिणामांची काही निरीक्षणेव्यायाम, पर्वतारोहण, मैदानी खेळ खेळताना किंवा कष्टाची कामे करताना शरीरातील स्नायूंच्या उतींची ऑक्सिजनची व ऊर्जेची मागणी वाढते. त्यामुळे श्वसन प्रक्रियेचा वेग वाढून ऑक्सिजनचा अधिक पुरवठा केला जातो. त्याच वेळी लागणाऱ्या ऊर्जेसाठी शरीरातील चरबीचे ऊर्जेत रूपांतर केले जाते. या प्रक्रियेसाठीही ऑक्सिजनच लागतो. अशा प्रकारे तयार झालेल्या ऊर्जेवरच स्नायू काम करतात. अशा लोकांनी ऑक्सिजनेटेड पाणी प्यायल्यास त्यांच्या शरीराला (पर्यायाने स्नायूंच्या उतींना) ऑक्सिजनचा पुरवठा अधिक होतो. त्यामुळे त्यांना त्वरित तरतरी येऊन थकव्यातून लवकर बाहेर येत असल्याचे अनेक अभ्यास ‘स्पोर्ट्स मेडिसीन स्टडीज’मध्ये दिसतात..स्नायूंच्या अधिक हालचालींमध्ये आवश्यक त्या ऊर्जेसाठी चरबीतील ऊर्जा वापरली जाते. चरबीमधून ऊर्जा निर्माण होताना लॅक्टिक आम्लाची निर्मिती होते. ते स्नायूत साचून राहिल्याचा परिणाम म्हणजेच स्नायू दुखणे होय. मात्र ऑक्सिजनेटेड पाणी प्यायल्यास या आम्लाचा प्रभाव कमी राहून स्नायू लवकर पूर्ववत होण्यास मदत होते. परिणामी, श्रमांच्या कामानंतर अंग दुखणे टाळता येते. याचा फायदा श्रमिक व्यक्तींसोबतच शरीर सुदृढ करण्यासाठी अति व्यायाम करणाऱ्या कुस्तीगीर किंवा खेळाडूंनाही होऊ शकतो.अस्थमा व तत्सम श्वसनाचे विकार असलेल्या लो कांना श्वसनातून शरीरातील पेशींना पुरेसा ऑक्सिजन मिळू शकत नाही. त्यामुळे अधिक अस्वस्थता जाणवते. परंतु प्राणवायूयुक्त पाण्याच्या सेवनाने या प्राणवायूची कसर भरून निघू शकते. अशा पाण्याच्या सेवनामुळे त्यांना काही प्रमाणात आराम मिळू शकतो.ऑक्सिजनेटेड पाणी हे पोषणमूल्याच्या बाबतीत साध्या पाण्यासारखेच असते. त्याला वेगळे अधिक पोषणमूल्य काहीही नाही..Groundwater Recharge : शोषखड्ड्यांचे आरोग्यपूर्ण ‘मॅजिक’.मानवी शरीरासाठी प्राणवायूचा मुख्य स्रोत फुप्फुसे आहेत. मात्र ऑक्सिजनेटेड पाण्यामुळे पचनसंस्थेद्वारे काही प्रमाणात त्याचे शोषण होऊ शकत असल्याचा जर्मन, जपान येथील अभ्यासातील निष्कर्ष आहेत. या पाण्याच्या सेवनाने आतड्यांचे आरोग्य सुधारते. विशेषतः आतड्यातील सूक्ष्मजीवांच्या समुदायावर (मायक्रोफ्लोरा -लॅक्टोबॅसिलाय, बिफिडोबॅक्टेरिया) चांगले परिणाम दिसतात. अन्नपचन व अन्न शोषणासाठी आतड्यातील उपयुक्त जिवाणूंचे आरोग्य सुधारते. त्याचवेळी हानिकारक किंवा उपद्रवी सूक्ष्मजीवांवर (पॅथोजन) नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे E. coli किंवा Clostridium या रोगकारक जीवाणूंच्या वाढीस अडथळा येतो. त्यांची संख्या कमी होऊन ते त्यांचा एकूण परिणाम निष्प्रभ होतो. या सर्वांमुळे माणसाचे पचन सुधारते. त्यातून शरीराला अन्नघटक उत्तम रीतीने मिळू शकतात. यातून शरीराची सुदृढता वाढते. पचनाचे विकार, बद्धकोष्ठता व तत्सम विकार दूर होण्यास मदत होते..शरीरातील पांढऱ्या पेशींची निर्मिती वाढते. शरीरातील सर्वच पेशींना भरपूर ऑक्सिजन मिळाल्याने त्या अधिक सुदृढ होत जातात. परिणामी, शरीराची प्रतिकारक्षमता उत्तम राहते. शरीराची ही प्रतिकारशक्ती कॅन्सर पेशींची ही वाढ रोखते.या पाण्यामुळे रक्ताचा सामू बराचसा संतुलित राहतो. परिणामी मूत्रपिंडाचेही कार्य सुधारते.ऑक्सिजनची अधिक मात्रा असलेले पाणी गोड व रुचकर लागते.या पाण्याचा वापर करणाऱ्या व्यक्तींची त्वचा आरोग्यपूर्ण होते. त्वचेवरील जखमा या पाण्याच्या नियमित सेवनाने व या पाण्याच्या फवाऱ्याने लवकर बऱ्या होत असल्याचे निरीक्षण आहे.काही प्रमाणात मानसिक आरोग्य चांगले राखण्यात हे पाणी उपयोगी ठरत असल्याचे निरीक्षण आहे.ऑक्सिजनची अधिक मात्रा (६०० मि.ग्रॅ. प्रति लिटर) पाण्याने गुळण्या केल्यास दाताचे आरोग्य चांगले राहते. तोंडातील हानिकारक जिवाणू नष्ट करण्याची करण्याची क्षमता असल्याने टूथपेस्ट वापरण्याची गरज पडत नाही.ॲण्टिबायोटिक (प्रतिजैविक) औषधांना ऑक्सिजनची विशिष्ट मात्रा असलेले पाणी काही प्रमाणात पर्याय ठरू शकते. या पाण्याचा वापर केल्याने रुग्ण बरे झाल्याची अनेक उदाहरणे आहेत..त्वचेवरील रक्तस्रावाप्रमाणेच शरीरांतर्गत होणारा मर्यादित स्वरूपाचा रक्तस्रावही लवकर थांबतो.शरीरातील अपायकारक, विषारी आणि धोकादायक संयुगे बाहेर टाकण्यासाठी व त्यांचा प्रभाव कमी करण्यासंदर्भात ऑक्सिजनेटेड पाणी वापराबाबत संशोधन सुरू आहे.इशारा ः मानवी शरीर ५००० मिलिग्रॅम प्रति लिटरपर्यंतचे ऑक्सिजनेटेड वॉटर सहन करू शकते. परंतु अति प्रमाणात घेतल्यास ऑक्सिजनेटेड पाण्याचे अनेक फायदे असले तरी मानवी शरीराबाबत काही मर्यादाही आहे. मानवी शरीर हे जास्तीत जास्त ५००० मिलिग्रॅम प्रति लिटर ऑक्सिजनयुक्त पाणी सहज सहन करू शकते. यापुढील मात्रा असलेल्या पाण्यामुळे ऑक्सिजन टॉक्सिसिटी (विशेषतः रक्तातील ROS वाढणे) येऊ शकते. म्हणून काही व्यक्ती आणि आजारांमध्ये ऑक्सिजनेटेड पाणी वापर हा अपायकारक व धोकादायकही ठरू शकतो. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय वापराचा कोणताही निर्णय घेऊ नये.- सतीश खाडे ९८२३०३०२१८,(लेखक पाणी अभ्यासक असून, पाणी तंत्रज्ञावर लिहिलेल्या ‘अभिनव जलनायक’ या पुस्तकाचे लेखक आहेत.) .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.