Parbhani News: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० अंतर्गत (हवामानाकुल कृषी प्रकल्प : Project on Climate Resilient Agriculture (PoCRA) निवड झालेल्या परभणी जिल्ह्यातील १७३ गावांपैकी १६६ गावांतील ४ हजार ३२८ शेतकऱ्यांनी शुक्रवार (ता. १९) पर्यंत वैयक्तिक लाभाच्या घटकांसाठी ६ हजार ९६ अर्ज केले आहेत. याशिवाय पोकरामध्ये निवड झालेल्या १७३ गावांतील महाडीबीटीवरील साडेचार हजारांवर अर्जाचा पोकरामध्ये समावेश करण्यात आला, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. .राज्य शासन व जागतिक बँक यांच्या भागीदारीतून कृषी विभागामार्फत पोकरा २.० प्रकल्प राबविला जात आहे. याअंतर्गत शेतकरी अर्ज करण्याची सुविधा वेब पोर्टल तसेच महाविस्तार एआय अॅपद्वारे उपलब्ध आहे. https://dbt-ndksp.mahapocra.gov.in या संकेतस्थळावरुन अर्ज करता येतील. फार्मर आयडीचा (शेतकरी ओळख क्रमांक) वापर करून थेट लॉगिनची सुविधा आहे. नोंदणीची आवश्यकता नाही. अॅग्रीस्टॅकद्वारे शेतजमिनीचा तपशील उपलब्ध करून घेतला जात असल्याने शेतकरी स्तरावरून ७/१२ व ८ अ अपलोड करण्याची आवश्यकता नाही. सर्व योजनांतील हमीपत्रे/बंधपत्रे डिजिटल स्वरूपात घेतली जात आहेत. या प्रकल्पांतर्गत ५ हेक्टर पर्यंत जमीनधारणा असलेल्या शेतकऱ्यांना लाभ देय राहील..बीजोत्पादन या घटकासाठी कमाल जमीनधारणेची अट असणार नाही. भूमिहीन कुटुंबातील सदस्याकरिता नोंदणीची आवश्यकता असून, नोंदणीनंतर त्यांना शेळीपालन या घटकाचा लाभ देय राहील. सामाईक जमीन धारणा असलेल्या लाभार्थी यांनी इतर खातेदाराचे संमतिपत्र पोर्टल वर उपलब्ध कारण देण्यात आलेल्या नमुन्यामध्ये सादर करणे आवश्यक आहे..POCRA Project: ‘पोकरा’ भरती पात्रतेतील विसंगतीमुळे नाराजीचा सूर.महाडीबीटीवरील अर्ज पोकरामध्ये वर्ग....महाडीबीटी अंतर्गंत विविध घटकांच्या लाभासाठी केलेले ४ हजार ६९२ अर्ज पोकरा मध्ये वर्ग करण्यात आले आहेत. त्यात परभणी तालुक्यातील ७८५ अर्ज, जिंतूर ७५६, सेलू ७०७, मानवत ३९८, पाथरी ६२९, सोनपेठ २८१, गंगाखेड ३८३, पालम २१४, पूर्णा तालुक्यातील ५३९ अर्ज आहेत..POCRA Project : ‘पोकरा’तून साधणार शेती, शेतकरी समृद्धी.पोकरा २.० अंतर्गत लाभाचे घटक...फळबाग लागवड, ठिबक सिंचन संच, तुषार सिंचन संच, वैयक्तिक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, शेततळ्यातील मत्स्यपालन, बीजोत्पादन, रेशीम उद्योग, शेडनेटगृह /हरितगृहामधील लागवड साहित्य,.गांडूळ खत व नाडेप, विहीर पुनर्भरण, वानिकी आधारित वृक्ष लागवड, बांबू लागवड, पाईप व पंप संच (अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील लाभार्थी) शेळीपालन (भूमिहीन कुटुंबातील व्यक्ती, विधवा, परितक्त्या व घटस्फोटीत महिला)..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.