Nanded division Sugar Data: प्रादेशिक सहसंचालक (साखर) नांदेड कार्यालयांतर्गत नांदेड विभागातील ३० साखर कारखान्यांनी यंदा गाळप सुरू केले होते. हे सर्वच कारखाने बंद झाल्याने विभागाचा गाळप हंगाम आटोपला आहे. यंदा या कारखान्यांनी एक कोटी २६ लाख पाच हजार ९०३ टन उसाचे गाळप तर एक कोटी १९ लाख दोन हजार ७७२ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. .मागीलवर्षी २९ साखर कारखान्यांनी ९८ लाख ६९ हजार टन उसाचे गाळप केले होते. यंदा तुलनेत २७ लाख ३६ हजार टन उसाचे गाळप अधिक झाल्याची माहिती प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाकडून मिळाली. नांदेड विभागात मागील २०२४-२५ हंगामात २९ साखर कारखान्यांनी ९८ लाख ६९ हजार टन उसाचे गाळप केले होते..Sugarcane Crushing: ‘लोकशक्ती’कडून दीड लाख टन उसाचे गाळप .त्या तुलनेत यंदा तब्बल २७ लाख ३६ हजार टन अधिक ऊस गाळप झाल्याची माहिती प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाकडून देण्यात आली. यंदा या कारखान्यांनी एक कोटी २६ लाख पाच हजार ९०३ टन उसाचे गाळप तर एक कोटी १९ लाख दोन हजार ७७२ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. मागीलवर्षी २९ साखर कारखान्यांनी ९८ लाख ६९ हजार टन उसाचे गाळप केले होते. यंदा तुलनेत २७ लाख ३६ हजार टन उसाचे गाळप अधिक झाले आहे..जिल्हानिहाय पाहता, लातूर जिल्ह्यात सर्वाधिक ५५ लाख ३१ हजार २५० टन ऊस गाळप झाले असून, त्यानंतर परभणी (३३,०३,०१८ टन), नांदेड (२१,३४,७९९ टन) व हिंगोली (१६,३६,८३७ टन) असा क्रम लागतो. साखर उत्पादनातही लातूर जिल्हा आघाडीवर राहिला आहे. हंगामात परभणी जिल्ह्यात ७ खासगी कारखाने, हिंगोली जिल्ह्यात २ खाजगी व ३ सहकारी असे ५, नांदेड जिल्ह्यात ५ खाजगी व १ सहकारी असे ६, तर लातूर जिल्ह्यात ६ सहकारी व ६ खासगी असे १२ कारखाने कार्यरत होते. दरम्यान, यंदाच्या गाळप हंगामात काही कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीकडे वळविल्यामुळे साखर उताऱ्यावर काही प्रमाणात परिणाम झाल्याचेही दिसून आले.तरीही एकूण गाळप व उत्पादनाच्या दृष्टीने हा हंगाम समाधानकारक ठरला आहे..Sugarcane Crop Protection: अवकाळी पाऊस व गारपीटग्रस्त पिकात करावयाचे उपाय.गाळपात आघाडीवर राहिलेले कारखानेट्वेन्टीवन शुगर माळवटी, लातूर...........८,३४,०६३ टनबळीराजा साखर कारखाना पूर्णा.........७,४१,२५७ टनगंगाखेड शुगर अँड एनर्जी, गंगाखेड......७,२२,६६५ टनट्वेन्टीवन शुगर सायखेडा, सोनपेठ........७,०१,५५२ टनजागृती शुगर तळेगाव देवणी, लातूर.....६,६४,००८ टनविलास सह, साका निवळी, लातूर.......६,५१,४३१ टनश्री सुभाष प्रा. लि. हदगाव................५,८०,५५५ टनभाऊराव चव्हाण, देगाव नांदेड...........३,८२,२४० टन.कारखानिहाय ऊस गाळप, साखर उत्पादन(गाळप टनात, साखर उत्पादन क्विंटलमध्ये)जिल्हा कारखाने ऊस गाळप साखर उत्पादननांदेड सहा २१,३४,७९९ २०,६६,२९०लातूर १२ ५५,३१,२५० ५२,२४,८९७परभणी सात ३३,०३,०१८ ३०,३१,४५५हिंगोली पाच १६,३६,८३७ १५,८०,१३०एकूण ३० ०१,२६,०५,९०३ ०१,१९,०२,७७२विभागाचा सरासरी साखर उतारा : ९.४४ टक्के.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.