Agri Stack: अॅग्रीस्टॅक अंतर्गत ८४ हजारांवर शेतकऱ्यांची नोंदणी बाकी
Farmer ID: केंद्र सरकारच्या अॅग्रीस्टॅक योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यात ८१ टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी पूर्ण केली आहे. तरीही हजारो शेतकऱ्यांना अजून ‘फार्मर आयडी’ मिळाला नाही, त्यामुळे ते अतिवृष्टी अनुदानासह विविध शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित आहेत.