Ahilyanagar News : पर, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील तेरा तालुक्यांना मदत मिळणार आहे. राज्य शासनाने काढलेल्या अध्यादेशात कर्जत, पाथर्डी, नेवासा, शेवगाव, राहाता, श्रीरामपूर, जामखेड, अहिल्यानगर, पारनेर, राहुरी, श्रीगोंदा, कोपरगाव, संगमनेर या तालुक्यांचा समावेश आहे. .या तालुक्यात एका महिन्यातच (सप्टेंबर) १३०० गावांतील ८ लाख ३४ हजार ५७८ शेतकऱ्यांच्या शेतातील ५ लाख ७४ हजार ६०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. अजून अंतिम आकडेवारी निश्चित व्हायची आहे..Crop Damage Compensation : अतिवृष्टीचे ४८ कोटी ‘महाआयटी’वर अपलोड .अहिल्यानगर जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात पुर, अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले आहे. त्याबाबत राज्य शासनाने जून ते सप्टेंबर या कालावधीत झालेल्या नुककसानीबाबत अध्यादेश काढून मदतीचे स्वरूप निश्चित केले आहे. राज्यातील २५३ तालुक्यात तर अहिल्यानगर जिल्ह्यात १३ तालुक्यात नुकसान झाल्याचे नमुद केले आहे. .Crop Damage Compensation: कर्नाटकात शेतकऱ्यांना प्रति हेक्टर १७ हजार नुकसान भरपाई, 'एनडीआरएफ' निकषांच्या दुप्पट मदत.त्यानुसार मृत व्यक्तीचा प्रत्येकी चार लाख रुपये, ४० ते ६० टक्के अपंगत्व आल्यास ७४ हजार रुपये, ६० टक्केपेक्षा अधिक अपंगत्व आल्यास अडीच लाख, उपचारासाठी ५ हजार ४०० ते १६ हजार, घर नष्ट झाल्यास एक लाख वीस हजार ते १ लाख तीस हजार, अशंत पडझड झाल्यास चार हजार ते साडेसहा हजार, झोपडी आठ हजार, गोठा तीन हजार, दुभत्या जनावरांना ३७ हजार ५००, बैलासाठी ३२ हजार, लहान जनावरांना वास हजार, शेळी-मेंढीला चार हजार, कुक्कुटपालनासाठी प्रती कोंबडी शंभर रुपये, शेतपिकाला जिरायतीसाठी हेक्टरी साडेआठ हजार, बागायतीसाठी सतरा हजार व बहुवाषिक पिकांसाठी साडेबावीस हजार, शेतजमीनीतील गाळ वाहून गेल्यास हेक्टरी १८ हजार आणि जमीन पुर्णतः वाहुन गेल्यास ४७ हजार रुपये हेक्टरी मदत दिली जाणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.